किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न.
किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न.
दि 06 जानेवारी 2026 रोजी किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ह्या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा हा “महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक महोत्सव समिती” यांच्या पुढाकाराने अगदी उत्साहात आणि उत्तमरित्या पार पडला. सोहळ्याच्या सुरुवातीला यावेळी मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणूक, राजराजेश्वर मंदिरात अभिषेक, दुर्गसंवर्धकांच्या व वाफगाव ग्रामस्थांच्या हस्ते गड पूजन व ध्वजारोहण, मर्दानी खेळ, होळकर राजपरिवार व लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला. ऐतिहासिक वंशजांच्या हस्ते तळीभंडार करण्यात आले. श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर व प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर श्री. लक्ष्मण नजण लिखित “अटकेचा रणसूर्य” या सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण व पुण्यश्लोक आहिल्यादेवींच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर राज्यभिषेक महोत्सवाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .
राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. जगभरात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीजं लढवय्या मनात पेरली. राजस्थान, माळवा, पंजाब, दिल्ली इतक्या भल्या मोठ्या प्रदेशात महाराजांनी इंग्रजांविरुद्ध युद्धे लढली. भारतमातेच्या रक्षणासाठी आपसातील मतभेद विसरुन देशभरातील सर्व राजा महाराजांना एकत्र येण्याचे आवाहन केले. इंग्रज यशवंतराव महाराजांना भारताचा नेपोलिअन म्हणत. महाराजांशी बिनशर्त संधी करण्याची इंग्रजांची मानसिकता होती. मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता. हा इतिहास तरुणांना प्रेरणादायी आहे .
या पराक्रमी देशभक्त राजाचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तु पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आज २५० वर्षां नंतर संवर्धित होत आहे. संवर्धनाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. किल्ल्याचे बदललेलं स्वरूप आपण सगळे पाहत आहोत हे सर्व आपल्या सगळ्यांच्या साथीने शक्य झाले. हा राज्याभिषेक महोत्सव “लोकोत्सव” व्हावा अशी भावना श्रीमंत भुषणसिंहराजेंनी व्यक्त केली .
भविष्यात कोणकोणती महत्वाची कामे किल्ले वाफगाव येथे करणार आहोत ह्या बद्दल देखील श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांनी माहिती दिली.
किल्ल्याचे संवर्धन काम प्रगतिपथावर असल्याने किल्ल्याच्या वैभवात भर पडली आहे याचा आम्हाला आनंद आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून गडाचे काम होत आहे, येत्या काळात अनेक कामे किल्ल्या मध्ये व गावात आपल्याला करायची आहेत, त्यामुळे पर्यटन वाढेल, रस्ते, पाणी असे अनेक प्रश्न मार्गी लागतील, परिसराचा विकास होईल, ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.. हाच आमचा हेतू आहे अशी भावना होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केली. त्यांच्याच नेतृत्त्वात होळकर राजपरिवारा तर्फे राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते.
या सोहळ्यास करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री नारायण आबा पाटील, श्री जयसिंग तात्या शेंडगे , मा. आमदार श्री रमेश भाऊ शेंडगे, माजी राज्यमंत्री श्री. बाळासाहेब दोलतडे , संघर्षयोद्धा श्री. दिपक भाऊ बोऱ्हाडे, श्री . मल्हार शेंडगे , श्री. आप्पासाहेब देशमुख, श्री. बळीराम खटके, श्री. शिवदास बिडगर , माय सह्याद्री परिवाराचे श्री .महेश भुजबळ यांच्यासह यशवंतराव महाराजांवर प्रेम करणारे समाज बांधव व भगिनी त्याचबरोबर संपूर्ण देशातून अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Historical tours Turkey The service was top-notch and the staff always smiling. https://linkstap.com/travelshopbooking