जिव्हाळा कडुन दिवाळीत जीवनाश्यक वस्तुचे वाटप एक हात मदतीचा सामाजिक उपक्रम

youtube

जिव्हाळा कडुन दिवाळीत जीवनाश्यक वस्तुचे वाटप एक हात मदतीचा सामाजिक उपक्रम

उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांची होती उपस्थिती
लोकमत न्युज नेटवर्क / २ नोव्हेबर
उमरखेड –
जिव्हाळा संस्था च्या वतीने दिपावली च्या पावन पर्वावर “जिव्हाळ्याची गोड दिवाळी” एक हात मदतीचा सामाजिक उपक्रम मागील सात वर्षा पासून अतिशय गरजवंत, गोर गरीब, ऊसतोड कामगारांच्या व झोपडपटीतील बालकांच्या, गरजू उपेक्षितांसोबत साजरी होणारी जिव्हाळ्याची गोड दिवाळी याही वर्षी दिपावली निमित्य उमरखेडचे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या हस्ते उमरखेड येथे अतिशय गरजवंत विधवा ,दिव्यांग व घरकाम करणाऱ्या ५२ महिलांना दिवाळी रेशन किट व बालकांना दिवाळी फराळ वितरण करून जिव्हाळ्याची गोड दिवाळी सणात जीवनाश्यक वस्तुचा वाटप करण्यात आला
जिव्हाळा संस्था मागील १३ वर्षा पासून अतिशय गरजवंत, गोर गरीब, गरजू उपेक्षितांसाठी अहोरात्र अविरत कार्य करत आहे. त्यामध्ये महिला व बाल सक्षमीकरण, आरोग्य, सिंचन, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामविकास, मदत व सेवा कार्य इत्यादी विषयांवर संपूर्ण महाराष्ट्रतच नव्हे तर देशातील विविध राज्यात संस्था निस्वार्थपणे अविरत कार्य करत आहे. या कार्यक्रमा प्रसंगी जिव्हाळा संस्थे चे संस्थापक अध्यक्ष अतुल लताताई राम मादावार यांनी संस्थे च्या मागील कार्यावर व जिव्हाळ्याची गोड दिवाळी एक हात मदतीचा सामाजिक उपक्रम या उपक्रमा वर प्रकाश टाकला जिव्हाळा संस्था मागील सात वर्षा पासून अतिशय गरजवंत, गोर गरीब, भिक्षेकरी, ऊसतोड कामगारांच्या व झोपडपटीतील बालकांसोबत, गरजू उपेक्षितांसोबत हा उपक्रम फार मोठ्या प्रमाणात दिवाळी चे विविध साहित्य वाटप करून उपेक्षितांसोबत दिवाळी साजरी करीत असते.
उपक्रमासाठी स्थानिक चे शेतकरी, व्यापारी, कर्मचारी व पत्रकार बांधव इत्यादी सुद्धा जीवनाश्यक साहित्य वाटपात सढळ हाताने दर वर्षी मदत करतात त्यामुळे हि जिव्हाळ्याची गोड दिवाळी गरजवंत, उपेक्षितांसोबत साजरी होते तसेच त्यांनी सांगितले उपक्रम सुरुवात भद्रा ऍग्रो, नागपूर चे संचालक अश्विनीकुमार कळलावे व उमरखेड येथील व्यापरी मितवा मेन्सवेअर चे संचालक गोविंद गांजरे यांनी राशन किट ची विनामुल्य मदत केली त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानुन उपेक्षितां पर्यत आपली अमुल्य मदत पोहोचेल असे ते म्हणाले
या कार्यक्रमा प्रसंगी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल मादावार, संस्थेचे सदस्य रामराव मादावार, संस्थेचे सल्लागार सदस्य संगीता मादावार, रवींद्र रामधनी, श्रीकांत शहा, परमेश्वर मांजरे, विलास जंगले आदी उपस्थित होते
सोबत –
फोटो जोडला

Google Ad
Google Ad

2 thoughts on “जिव्हाळा कडुन दिवाळीत जीवनाश्यक वस्तुचे वाटप एक हात मदतीचा सामाजिक उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!