ढाणकी व उमरखेड गणपती विसर्जन मिरवणुक शांततेत संपन्न – पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त.
ढाणकी व उमरखेड गणपती विसर्जन मिरवणुक शांततेत संपन्न – पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त
उमरखेड –
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपती बप्पा ला निरोप देण्यात आला. दि .28 सप्टेंबर रोजी आनंत चतुर्दशी असल्यामुळे ढाणकी उमरखेड शहरांमधील सर्व गणेश मंडळांनी धूम पाहायला मिळत होती. रोशनी शोभायात्रा प्रसन्न
गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीला ढाणकी व उमरखेड येथे सुरुवात करण्यात आली. तसेच ढाणकी येथील मानाचा गणपती तरुण उत्सव मंडळ यांची सर्वप्रथम आरती उप पोलीस निरीक्षक विनायक कोते व ठाणेदार सुजाता बनसोड व बाळासाहेब चंद्रे यांच्या हस्ते व समस्त गावकरी मंडळाच्या उपस्थित आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.तसेच ही मिरवणूक अत्यंत शांतपणे संपन्न झाली व ढाणकी परिसरातील सर्वच गणपती बाप्पा ची गणपती मिरवणूक.डीजेच्या तालावर ठेका धरत गणेश भक्त ने ठेका धरून गणपती बाप्पांना निरोप दिला .गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा गणेशक्षभक्तांनी दिली. उमरखेड येथील गणपती मिरवणूक ही अतिशय शांत तेने पार पडली तसेच या मिरवणुकीला पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त होता व ही मिरवणूक शांततेपणे संपन्न झाली.