गजानन काचर्डे येथील 140 कि.लो वजनाच्या लढवय्या तरूणाचा अल्प आजाराने निधन.

youtube

विडूळ येथील गजानन काचर्डे १४० किलो वजनाच्या लढवय्या तरूणाचा अल्प आजाराने निधन

उमरखेड..
उमरखेड तालुक्यातील वीडूळ येथील १४० किलो वजनाच्या व ४० वर्ष वय असलेल्या गजानन शिवशंकर काचर्डे विडुळ यांचे अल्प आजाराने दुखःद निधन झाले.गजानन काचर्डे यांचे वयाच्या दुसऱ्या वर्षी पासून दरवर्षी दहा दहा वजन वाढत जाऊन वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचे वजन एकशे ऐंशी किलो झाली वाढत्या वजनामुळे त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला त्यातच गजुच्या लहानपणी वाढत्या वजनामुळे तो एखादया जपानी छोट्या सुमो सारखा अगडबंबं दिसायला लागला त्यामुळे लहान मुलांकडून त्याला चिडवणे, डीवचणे असे प्रकार व्हायचे तरीही त्याने बि.ए. पर्यंत आपले शिक्षण पुर्ण केले होते मागच्या मार्च महीण्यातच जि.प.चे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी त्याला एक प्रींटग मशिन देवुन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती त्याचे कुटुंबात आई वडील व १ भाऊ व १ बहीण आहे. शरीराची व्याधी असून सुद्धा शिक्षण आणि नोकरीसाठी झगडणारा एक लढवय्या काळाने आपल्यातून हिरावून नेला या अत्यंत दुर्दैवी घटनेने संपुर्ण विडूळ गाव हळहळ व्यक्त करीत आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!