इनरव्हील क्लब कडुन जिल्हा परिषद कन्या शाळा च्या विदयार्थी चे *हिमोग्लोबिन* व. *आरोग्य तपासणी*

इनरव्हील क्लब कडुन जिल्हा परिषद कन्या शाळा च्या विदयार्थी चे *हिमोग्लोबिन* व.
*आरोग्य तपासणी*
*उमरखेड*
इनरव्हील क्लब ऑफ उमरखेड तर्फे जिल्हा परिषद कन्या शाळा येथे विदयार्थी चे हिमोग्लोबिन तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले त्यामध्ये डॉक्टर वैदही कुलकर्णी यांनी मुलींना वेगवेगळ्या आजाराबद्दलची माहिती तसेच मासिक पाळी बद्दलची माहिती हिमोग्लोबिन याबद्दलची माहिती देऊन त्यांची आरोग्य तपासणी केली आणि त्यांना विटामिन बी व्हिटॅमिन डी, बी कॉम्प्लेक्स असे वेगवेगळ्या पद्धतीचे औषधी देण्यात आले. तसेच ठाकरे पॅथॉलॉजी मधील बाळू चिंचोलकर यांनी मुलींचे एच .बी तपासणी केली. आणि त्याबद्दल माहिती दिली तसेच मुलींनी आहारात काय काय खायला पाहिजे जेणेकरून त्यांची शारीरिक व मानसिक प्रकृती व्यवस्थित राहील याबद्दल माहिती दिली चिचोलकर यांनी दिले.
यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रीतीताई धामणकर पीपी सरोज मांडवगडे बीपी, जयश्री देशमुख,माधुरी देशमुख व ईनरव्हील क्लब सर्व चि टिम व शाळेच्या शिक्षिका शिंदे व मस्के उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा काळेश्वर यांनी केले आभार माधुरी देशमुख यांनी मानले.
246 thoughts on “इनरव्हील क्लब कडुन जिल्हा परिषद कन्या शाळा च्या विदयार्थी चे *हिमोग्लोबिन* व. *आरोग्य तपासणी*”