काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरूच ( मागील एका महिन्यात 3000 लोकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश – तातू देशमुख ) उमरखेड

youtube

काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरूच

 

( मागील एका महिन्यात 3000 लोकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश – तातू देशमुख )

उमरखेड :- सर्व जाती धर्म पंथाला घेऊन चालणाऱ्या काँग्रेसमध्ये मागील एका महिन्यात 3000 लोकांनी प्रवेश केला .येणाऱ्या काळात पूर्ण विधानसभा काँग्रेसमय करण्यासाठी ताकतीने काम करू असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातूजी देशमुख यांनी केले .
महागाव तालुक्यातील तिवरंग येथील उपसरपंच तथा अजित पवार राष्ट्रवादी गटाचे उपजिल्हाध्यक्ष गुणवंत राठोड यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह काँग्रेसचे तातुजी देशमुख , राम देवसरकर ,साहेबराव कांबळे व गोपाल अग्रवाल यांच्या नेतृत्वात स्थानिक राजस्थानी भवन येथे आज दि ६ रोजी पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेश केला यावेळी अध्यक्षीय भाषणात तातुजी देशमुख बोलत होते .
यावेळी मंचावर राम देवसरकर ,दत्तराव शिंदे, नंदकिशोर अग्रवाल ,महेंद्र कावळे ,बाळासाहेब चंद्रेपाटील ,साहेबराव कांबळे, शैलेश कोपरकर, गोपाल अग्रवालसह काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार उपस्थित होते .
यावेळी गुणवंत राठोड यांनी आपले विचार करताना माझ्यावरती सत्ताधाऱ्यांनी खोटं बोलून गुन्हे दाखल केले त्याला कंटाळून मला काँग्रेस पक्षाची विचारधारा पटल्याने काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले .
यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती रामदेव सरकार यांनीही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करीत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाही शासन तिजोरी खाली करण्याचे काम करत आहे असे प्रतिपादन केले व नंदकिशोर अग्रवाल , शैलेश कोपरकर शेख तालीब, महिंद्र कावळे, संजय भगत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर जगताप यांनी केले तर आभार प्रेम वानखेडे यांनी मानले .

Google Ad
Google Ad

12 thoughts on “काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरूच ( मागील एका महिन्यात 3000 लोकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश – तातू देशमुख ) उमरखेड

  1. I was suggested this web site by my cousin Im not sure whether this post is written by him as no one else know such detailed about my trouble You are incredible Thanks

  2. Thanks I have just been looking for information about this subject for a long time and yours is the best Ive discovered till now However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!