उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हदगांवात १३१ जणांचे रक्तदान उद्धव ठाकरे आणि आष्टीकरांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा. 

youtube

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हदगांवात १३१ जणांचे रक्तदान
उद्धव ठाकरे आणि आष्टीकरांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

हदगाव / प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस व त्यासोबतच हदगावचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्या निमित्त हदगांव येथे घेतलेल्या रक्तदान शिबिरात १३१ जणांनी रक्तदान केले, तसेच अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, तामसा येथे शालेय साहित्याचे वाटप व धोंडे जेवण इत्यादी अनेक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी आज सकाळी सहा वाजता भोकर तालुक्यातील त्यांचे श्रद्धास्थान गुरु असलेल्या भुरुभुशी येथे जाऊन महंताचे दर्शन घेतले. आष्टी येथे त्यांचे वडील माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांच्या समाधीचे व आईचे दर्शन घेऊन तामसा येथे शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी तामसा येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना १००१ वह्यांचे वाटप केले. हदगांव येथे आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ करून श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत तामसा सर्कलच्या शिवसैनिकांच्या वतीने वाढदिवस साजरा करून त्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हदगाव येथे संपर्क कार्यालयामध्ये किनवट, हिमायतनगर, हिंगोली, वसमत, उमरखेड, महागांव, माहूर, कळमनुरी, बाळापुर इत्यादी भागातून शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. उमरखेड व कळमनुरी येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नागेश पाटील आष्टीकर यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या तयारी मध्ये मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. परंतु दिवसभर मुसळधार पाऊस व मुंबई जाण्याची घाई यामुळे आपण तिथे उपस्थित राहू शकलो नसल्याची खंत जिल्हाप्रमुख आष्टीकर यांनी बोलून दाखवली. यावेळी रक्तदान करणाऱ्या व शुभेच्छा देणाऱ्या तसेच सर्व स्नेही आप्तजन व हितचिंतकांच्या सोबत आष्टीकर कुटुंबीयांतर्फे अधिक मासानिमित्त धोंडे व स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दीपक मुधोळकर, किशोर भोस्कर, राहुल भोळे, अमोल पाटील रुईकर, दत्तराव कवळे पाटील, संतोष शिंदे, राजेंद्र जाधव, अमोल पाटील कोहळीकर इत्यादी सह अनेक पदाधिकारी यांनी चाहत्यांनी शिवसैनिकांना रक्तदान करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले. उद्धव ठाकरे आणि आष्टीकर या दोघांनाही शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व चाहत्यांचा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख या नात्याने आभार व्यक्त केले. शुभेच्छांचा स्वीकार करून शेवटी सायंकाळी आष्टीकर हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला रवाना झाले.

47 thoughts on “उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हदगांवात १३१ जणांचे रक्तदान उद्धव ठाकरे आणि आष्टीकरांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा. 

  1. Kasyno Compensation bez Depozytu za Rejestracje to jedna z najbardziej popularnych
    put up promocji oferowanych przez legalne platformy hazardowe online.
    Tego typu keepsake of gratefulness pozwala nowym uzytkownikom rozpoczac gre bez koniecznosci wplacania wlasnych srodkow na konto.

    Wystarczy zazwyczaj zalozenie konta oraz spelnienie okreslonych warunkow regulaminowych, aby otrzymac darmowe srodki
    lub darmowe obroty na wybranych automatach.
    Dla wielu graczy jest to atrakcyjna mozliwosc sprawdzenia
    funkcji kasyna bez ponoszenia dodatkowych kosztow.

  2. I feel this is one of the such a lot vital information for
    me. And i am happy reading your article. However wanna observation on few general things, The website
    taste is perfect, the articles is in reality great : D.
    Just right process, cheers

  3. Kasyno Compensation bez Depozytu za Rejestracje to jedna z najbardziej popularnych visualize promocji oferowanych przez legalne platformy hazardowe online.

    Tego typu douceur pozwala nowym uzytkownikom rozpoczac gre bez koniecznosci
    wplacania wlasnych srodkow na konto. Wystarczy zazwyczaj zalozenie konta oraz
    spelnienie okreslonych warunkow regulaminowych, aby
    otrzymac darmowe srodki lub darmowe obroty na wybranych automatach.
    Dla wielu graczy jest to atrakcyjna mozliwosc sprawdzenia funkcji kasyna bez ponoszenia dodatkowych kosztow.

  4. Перейти на сайт
    [url=https://tripscan77.us/]трипскан ссылка[/url]

  5. Hi there are using WordPress for your site platform?
    I’m new to the blog world but I’m trying to get started and set up my own. Do
    you need any html coding knowledge to make your own blog?
    Any help would be really appreciated!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!