उमरखेड-महागावमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत अकोल्यातील बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

youtube

उमरखेड-महागावमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत अकोल्यातील बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

उमरखेड : महाराष्ट्राचे कृषिमंत्री ना. श्री. दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला येथे अमरावती विभागातील पिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासह उमरखेड-महागाव मतदारसंघातील अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सॅटेलाईट पाहणीऐवजी महसूल व कृषी विभागाच्या प्रत्यक्ष पाहणी अहवालाला ग्राह्य धरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचा लाभ व आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.

मतदारसंघात पावसाचे अपुरे प्रमाण तसेच पावसामध्ये पडलेल्या प्रदीर्घ खंडामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. विशेषतः माळरानावरील शेती आणि बंदी भागातील पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी उभी पिके कोमेजून करपण्यास सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर उमरखेड-महागाव मतदारसंघाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि आवश्यक दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांना तातडीने मदतीची मागणी

मतदारसंघातील सद्यस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई, पीक विम्याचा लाभ तसेच आवश्यक त्या सर्व दुष्काळी उपाययोजना तातडीने लागू कराव्यात, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

या बैठकीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोकजी उईके, कामगार मंत्री आकाशजी फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजयजी राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार अनुप धोत्रे, आमदार चैनसुख संचेती, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार राजू तोडसाम, आमदार प्रविण तायडे, आमदार राजेश वानखडे, आमदार हरिश पिंपळे, आमदार श्वेताताई महाले, कृषी सचिव परिमल सिंह यांच्यासह जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक, महसूल, कृषी व महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

4 thoughts on “उमरखेड-महागावमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत अकोल्यातील बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा”

  1. I aam reaqlly enjoyingg thhe theme/design of yojr blog.
    Do yoou evesr run into anyy bowser compatibility problems?

    A handfu oof mmy bllog adience hawve complained abvout myy webzite noot working correctly iin Explorer butt looks greqt inn Chrome.
    Do yoou have any advikce too help fiix this issue?
    xnxx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!