अभि. सुरेंद्र कोडगीरवार यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती नागपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा उत्साहात संपन्न उमरखेड

youtube

अभि. सुरेंद्र कोडगीरवार यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

नागपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शपथग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

उमरखेड
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी अभि. सुरेंद्र कोडगीरवार यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनिमित्त रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथील महाराजबाग येथे शपथग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या सोहळ्याला राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष . नंदकुमार गादेवार, नागपूरचे दीपकभाऊ निल्लावार, महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई तसेच संघटक प्रदीप कोकडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत अभि. सुरेंद्र कोडगीरवार यांनी यवतमाळ जिल्हाध्यक्षपदाची शपथ घेतली.

याप्रसंगी उमरखेड येथील समाजाचे अध्यक्ष . राजेश्वर रायेवार, . महेश पत्तेवार, किरण मुक्कावार, . वैभव कोडगीरवार, . उदय पत्तेवार, तसेच महागाव येथील ज्ञानेश्वर कापरत्वार, . मनोज तगडपल्लेवार, . कुणाल चक्करवार, संदेश मुत्तेपवार यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अभि. सुरेंद्र कोडगीरवार यांनी आपल्या नियुक्तीबद्दल महासभेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक एकजूट अधिक बळकट करण्यासाठी, युवकांना संघटित करण्यासाठी तसेच समाजातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!