जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थांच्या वतीने वसुंधरा पायी दिंडी 21 उमरखेड मध्ये दाखल. उमरखेड

youtube

जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थांच्या वतीने वसुंधरा पायी दिंडी 21येणार उमरखेड

उमरखेड : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने पर्यावरण संवर्धनाचा महामंत्र आणि अध्यात्माचा पवित्र संदेश घेऊन ‘वसुंधरा पायी दिंडी’ नाणीजधामच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. पूर्व विदर्भ पीठ, नागपूरच्या वतीने आयोजित या दिंडीचा शुभारंभ ११ सप्टेंबर रोजी नागपुर येथील पीठावरून भक्तिमय वातावरणात झाला. सिद्ध पादुकांच्या पावन सान्निध्यात हजारो धामयात्री या पर्यावरण जागृतीच्या महायात्रेत सहभागी झाले आहेत.

नागपूर ते नाणीजधाम असा एक हजारहून अधिक किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास ही दिंडी सुमारे ४० दिवसांत पूर्ण करणार आहे. दररोज सुमारे २० ते २५ किलोमीटरचे अंतर पार करीत दिंडी महाराष्ट्रातील विविध गावांमधून पुढे सरकणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी नाणीजधाम येथे जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित भव्य वारी उत्सवात या दिंडीचे आगमन होणार आहे.

दिंडीच्या मार्गावरील गावांमध्ये ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्रत्यक्ष वृक्षारोपण या त्रिसूत्रीवर व्यापक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वृक्षारोपणासोबत।ळ वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचा संस्कार जनमानसात रुजविण्याचे कार्य या माध्यमातून होणार आहे. ही पायी दिंडी नागपूर ,वर्धा व यवतमाळ या ठिकाणाहून मार्गक्रमण करत आर्णी भोसा, महागाव व 21 सप्टेंबर रोजी उमरखेड या ठिकाणी दिंडीचा मुक्काम असणार आहे. सर्व ठिकाणाची व्यवस्था जिल्हा सेवा समिती यवतमाळ पश्चिम च्या वतीने करण्यात आली आहे. धाम यात्रेकरूना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी यवतमाळ जिल्हा सेवा समितीचे पदाधिकारी, पीठ समितीचे पदाधिकारी,तालुका कमिटी, सेवा केंद्र कमिटी, आरती केंद्र कमिटी, युवा सेना, हिंदू संग्राम सेना, महिला सेना, सर्व आजी व माजी पदाधिकारी यांच्या वतीने उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपूरच्या पूर्व विदर्भ पीठासह तेलंगणा, मराठवाडा, मुंबई, नाशिक, पुणे आणि गोवा येथूनही वसुंधरा पायी दिंडी चे आयोजन करण्यात आले आहे.
पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या धामयात्रींच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सुविधांसाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय पथक, सुरक्षा पथक आणि प्रवासासाठी आवश्यक विविध सेवा-सुविधा दिंडीसोबत उपलब्ध राहणार आहेत. जिल्हा सेवा समिती यवतमाळ पश्चिम मधील सर्वच तालुक्यातील उपासक, साधक शिष्य हितचिंतक गुरु बंधू व गुरु भगिनी यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख अर्जुन फुले, पीठ सहप्रमुख संजय खंडागळे, पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे, पीठ सह व्यवस्थापक ऋषिकेश बिरारी, जिल्हाध्यक्ष गोविंद उपासे यांच्यासह तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

4 thoughts on “जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थांच्या वतीने वसुंधरा पायी दिंडी 21 उमरखेड मध्ये दाखल. उमरखेड”

  1. Players from Quito to Guayaquil are finally getting a betting app that actually understands our mobile habits. The apk installs in a flash and the live dealer games stream like the Amazon river flow. I always keep my phone charged for my daily sessions and the payouts feel as warm as a Quito sunrise. ecnovibetapk

  2. Today, I weent tto thee beach ith mmy kids. I foound a ssea shell and gave it tto mmy 4 ear old dwughter aand saiud “You can hear the ocean if you put this to your ear.” Shhe plached tthe sshell tto hher
    earr and screamed. Thee wass a heemit ccrab inskde aand it ppinched hher ear.
    Shhe never waants too goo back! LoL I know this iss completely offf toppic
    bbut I had too tell someone! xnxx

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!