उमरखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ! काँग्रेस पक्षाच्या वतीने दिले मागणीचे निवेदन : करपलेल्या सोयाबीन ची झाडे दिली उपविभागीय अधीकाऱ्याच्या हातात ! प्रतिनिधी / दिनांक १६ सप्टेंबर उमरखेड :
- उमरखेड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा !
काँग्रेस पक्षाच्या वतीने दिले मागणीचे निवेदन
: करपलेल्या सोयाबीन ची झाडे दिली उपविभागीय अधीकाऱ्याच्या हातात !
प्रतिनिधी / दिनांक १६ सप्टेंबर
उमरखेड :
उमरखेड तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा अशी प्रमुख मागणी करीत, शेतकऱ्यांना पावसाच्या दिर्घकाळा पासुण पडलेल्या खंडामुळे हातातोंडाशी आलेल्या यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन हेक्टरी २ लाख रुपये मदत, ऊस व हळद उत्पादकांना हेक्टरी २ लाख रुपये शासनाने विशेष मदत करावी. तसेच गतवर्षीचा पिक विमा तातडीने मंजूर करावा, अशा विविध मागण्यासाठी, शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने, पावसाअभावी करपुन गेलेली सोयाबीनची झाडे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत, उपविभागीय अधिकाऱ्यांना बुधवारी याबाबतीचे निवेदन देण्यात आले.
उमरखेड तालुक्यात यावर्षी पावसाचे अत्यल्प व अनियमित प्रमाण, पावसातील मोठे खंड आणि प्रतिकूल हवामानामुळे शेती व शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अनेक भागांमध्ये पिकांची वाढ खुंटली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठा उत्पादन खर्च करून उभी केलेली पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन उमरखेड तालुका कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करावा, तसेच शेतकरी व पशुपालकांना तातडीने विशेष आर्थिक मदत व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
उमरखेड तालुका काँग्रेस कमिटी व उमरखेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शासन व प्रशासनाकडे खालील ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उमरखेड तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी २ लाख मदत द्यावी. तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई व पीक नुकसानीची पाहणी करून, उमरखेड तालुका तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करावा. तसेच खरीप नुकसानग्रस्त सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २ लाख आर्थिक मदत देण्यात यावी, ऊस व हळद उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २ लाख विशेष मदत द्यावी.
ऊस व हळद या पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च केलेला आहे. मात्र पाण्याअभावी व प्रतिकूल हवामानामुळे या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ऊस व हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २ लाख विशेष आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे .
इसापूर धरणातून तातडीने पाणी सोडावे. अशा विविध मागण्यांचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विधानसभा प्रभारी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे , अरविंद वाढोणकर , संजय मोघे, महेंद्र कावळे यांच्यासह तातू देशमुख , नंदकिशोर अग्रवाल , महेन्द्र कावळे , दत्तराव शिंदे , गोपाल अग्रवाल , ख्वाजाभाई कुरेशी , बाळासाहेब चंद्रे , गणेश बेले, धोंडबा माने , उत्तम पांडे, अनिल कदम, गजानन भारती, कैलास राऊत, तात्या चव्हाण, गजानन मिटकरे, अमोल तुपेकर, जाहीर काजी, हमीद काजी, युवराज जाधव, कयुमभाई विडुळ यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते निवेदन उपस्थित होते .
सोबत : फोटो


Feeling lucky today! The bonuses here are actually generous and easy to claim. I am definitely staying with luckybet7game for a long time.
Finally found a site that actually works smoothly. The login process is super fast and I didn’t encounter any glitches. Definitely a top choice for anyone looking for a reliable experience. Check out youwinlogin
Chơi tại {linkMình thấy pikashow download có tốc độ tải khá nhanh nên trải nghiệm tổng thể rất ổn. TONY09-18
Hello, everytuing iis goinhg well ere and ofcourse every onee
iss sharing data, that’s genunely fine, keep
uup writing. xnxx