पत्रकारांची मुस्कटदाबी खपवून घेणार नाही : डी. टी. आंबेगावे पत्रकारांच्या एकजुटीचा विजय.
पत्रकारांची मुस्कटदाबी खपवून घेणार नाही : डी. टी. आंबेगावे
पत्रकारांच्या एकजुटीचा विजय
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली या घटनेची न्यूज 18 लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे यांनी बातमी कव्हर केली म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पत्रकार गोविंद वाकडे यांच्या अटकेचा निषेध करून त्यांना तात्काळ मुक्त करावे यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि इतर पत्रकार संघटना आंदोलन करण्याच्या पावित्र्यात होत्या. आज त्यांची सुटका करण्यात आली आहे. पत्रकार संघटनांचा विजय झाल्याचे चित्र आहे आणि यामध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा सहभाग असने हे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची ताकद आहे. शिवाय अस्तित्वही असे पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा मंदा बनसोडे यांनी सांगितले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सर व पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी यांचे मनापासून आभार! कारण पत्रकारावर विनाकारण झालेला अन्याय कदापीही सहन केला जाणार नसल्याचे डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.