चित्रा जावंधिया यांना ‘आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ किताब देवळी
चित्रा जावंधिया यांना ‘आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ किताब
देवळी
वास्तुशास्त्र क्षेत्रात कार्यरत असलेल्या चित्रा जावंधिया यांना आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया’ या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांतून निवड करण्यात येत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार महिला कर्तृत्ववान पुरस्कार या कार्यक्रमात ‘स्पिरिच्युअल लीडरशिप’ या विभागात देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ, रिचा जेन यांनी केले होते. वास्तुशास्त्र आणि संबंधित क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आल्याचे आयोजकांनी नमूद केले.
यापूर्वीही चित्रा जावंधिया यांना 2024 मध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘वास्तु एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला होता. तसेच 2025 मध्ये ‘नवभारत एम्पॉवर वुमन’ या पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. अलीकडेच २ एप्रिल रोजी विधान भवन येथे आयोजित कार्यक्रमात ‘अधिकार’ मंचाकडून त्यांना गेस्ट स्पीकर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
चित्रा जावंधिया या वैदिक वास्तुशास्त्रात कार्यरत असून ‘बिना तोडफोड’ वास्तु उपाय आणि कलर थेरपी या संकल्पनांवर त्या काम करतात. निवासी तसेच व्यावसायिक ठिकाणी कोणतीही मोठी तोडफोड न करता वास्तुशास्त्रीय बदल सुचविणे, हा त्यांच्या कार्याचा मुख्य भाग आहे.
याशिवाय त्या सायंटिफिक लोगो डिझायनर म्हणूनही कार्यरत असून विविध कंपन्यांचे लोगो आणि शोरूम डिझाइन वैज्ञानिक पद्धतीने तयार करतात. तसेच सिग्नेचर रीडिंगच्या माध्यमातून व्यक्तीच्या स्वभाव आणि परिस्थितीचा अभ्यास करण्याचे कामही त्या करतात.
सामाजिक क्षेत्रातही त्या सक्रिय असून वर्धा जिल्हा माहेश्वरी समाजाच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यांच्या या यशामुळे वर्धा जिल्ह्याचे नाव सेंट्रल इंडियात उज्ज्वल झाल्याची भावना व्यक्त होत आहे.


I’ve been looking for a reliable spot and this one really delivers. The interface is smooth and everything loads quickly. Definitely worth a try! phjljl22
The slots here are actually fair and the graphics are stunning. I spend way too much time here because it is so addictive. Try iddewaslot88
Finally found a platform that actually understands the local market here. The deposits are fast and the odds are fair. Huge shoutout to ph1xbetphilippines!