डाव्या कालव्या वरील मायनर क्रमांक. ३ ची तात्काळ दुरुस्ती करा ; ३० नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा चातारी येथील शेतकऱ्याचाइशारा उमरखेड
डाव्या कालव्या वरील मायनर क्रमांक. ३ ची तात्काळ दुरुस्ती करा
; ३० नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा चातारी येथील शेतकऱ्याचाइशारा!
प्रतिनिधी / दिनांक २६ नोव्हेंबर
उमरखेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या ईसापुर धरणाच्या डाव्या कालव्यावरील मायनर क्र. ३ च्या समस्येमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कालव्यातून पाणी बाहेर येऊन शेतीचे व शेत पिकाचे नुकसान झाले आहे. याच चौकशी करून आवश्यक उपाय योजना कराव्यात यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित मायनरची दुरुस्ती न झाल्यास ३० नोव्हेंबर २०२६ पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा चातारी येथील शेतकर्यानी दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार संबंधित गैरअर्जदाराने शेतकऱ्याने मायनर फोडल्यामुळे आणि आउट लेट न केल्याने अर्जदारांच्या शेतजमिनीत पाणी जात असून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच मायनर क्र. ३ दुरुस्त नादुरुस्त असल्याने दादाराव माने आणि शिवाजी नागोराव माने यांच्या शेतजमिनीतून लोकांची ये जा होत असल्यानेही नुकसान होत आहे. त्यामुळे जाणारा रस्ता बंद करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून निघणाऱ्या मायनर क्र. ३ ची तात्काळ दुरुस्ती करावी व आउट लेट काढण्याचे यावे. तसेच गैरअर्जदार याने शेतीचा मोबदला घेऊनही ज्या ठिकाणी त्याने मायनर बुजवले आहे ते पुन्हा खोदकाम करून खुले करावे आणि संबंधित गैरअर्जदारांना सक्त ताकीद देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन तातडीने कार्यवाही न केल्यास आगामी ३० नोव्हेंबर २०२६ रोजी दादाराव नागोराव माने आणि यादव किसन पिंपरखेड यांनी आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून दिला आहे. या उपोषणामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, संबंधित मंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासनाला पाठविण्यात आल्या आहेत.
आता प्रशासन या प्रकरणात किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सोबत: फोटो

