मुले पळविण्याच्या संशयावरून गाडीची तोडफोड करून दांपत्याला मारहाण.

youtube

मुले पळविण्याच्या संशयावरून गाडीची तोडफोड करून दांपत्याला मारहाण

( बेलखेड येथील घटना )

उमरखेड : –
मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून खेडेगावात गल्लोगल्ली हिंडून साडी विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतिय दांपत्याला मारहाण करून त्यांच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना तालुक्यातील बेलखेड येथे आज दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजताचे दरम्यान घडली आहे . जमावाकडून मारहाण होत असल्याने व्यापारी इसम जीव मुठीत घेऊन घटनास्थळावरून पळून गेला . तर जीवाच्या आकांताने महिला व तिची मुले आक्रोश करीत असतांना काही गावकरी पोलीस तेथे पोहचल्यामुळे अनर्थ टळला . दरम्यान या घटनेमुळे अफवांना पेव फुटले असून अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासन तर्फे करण्यात आले आहे .
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील व्यापारी गावोगावी जाऊन व्यवसाय करण्यासाठी आपल्या स्पार्कियो वाहनाने उमरखेड कडे येत असताना कुपटी येथून भरधाव वेगाने वाहन आणत असताना मुले पळविणारी टोळी असल्याचा लोकांना संशय आल्यावरून समोर लोकांनी बेलखेड फाट्याजवळ नाकाबंदी केली असता सदर व्यापाऱ्याने आपले वाहन बेलखेड येथे नेले त्या ठिकाणी गावकऱ्यांनी व्यापारी मुकेश व त्याची पत्नी इना यांना मारहाण करून त्यांच्या स्कार्पिओ वाहनाची तोडफोड केली यावेळी मारहाणीच्या भितीने व्यापारी इसम पत्नी व मुलांना सोडून शेतात पळुन गेला . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बेलखेड येथे येऊन शहानिशा करून पत्नी व त्यांच्या मुलांना पोलीस स्टेशन येथे आणले असता गाडीतील सदर मुले ही त्यांचीच अपत्य असल्याचे निष्पन्न झाले परंतु मध्य प्रदेश पासिंग ची गाडी असल्याने तसेच गाडी लहान पाच-सहा मुले असल्यामुळे गावकऱ्यांना संशय आल्यावरून सदर घटना घडली या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून काही गावकरी व पोलिसांनी प्रसंगावधान राखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला दरम्यान या घटनेमुळे पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नागरिकांना केले असून सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पाडवी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अमोल माळवे स.पो. निरीक्षक अमोल राठोड करीत आहेत .

Google Ad
Google Ad

1 thought on “मुले पळविण्याच्या संशयावरून गाडीची तोडफोड करून दांपत्याला मारहाण.

  1. I am currently writing a paper that is very related to your content. I read your article and I have some questions. I would like to ask you. Can you answer me? I’ll keep an eye out for your reply. 20bet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!