आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करुन मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी. बिरसा क्रांती दल उमरखेड यांच्यावतीने राष्ट्रपतींना निवेदन.

आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करुन मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी.
बिरसा क्रांती दल उमरखेड यांच्यावतीने राष्ट्रपतींना निवेदन.
प्रतिनिधी…..
मणिपूर येथील महिलावर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कठोर शिक्षा व्हावी आणि मणिपूर राज्यात राष्ट्रपती लावण्यात यावी अशा आशयाचे निवेदन बिरसा क्रांती दल उमरखेड यांच्यावतीने देशांच्या राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्याकडे दिनांक २४ जुलै २३ रोजी देण्यात आले. यावेळी बिरसा क्रांती दलाचे उमखेड तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इशान्य भारतातील बहुतांश राज्ये हे आदिवासी बहुल आहेत. ते लोक आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेऊन आपल्या विकास साधण्यासाठी अहोरात्र परिश्रम करीत आहेत. परंतु त्यांच्यावर सातत्याने अन्याय अत्याचार केला जात आहे. त्यातूनच मुळ आदिवासी व गैर आदिवासी यांच्यात जीवघेणा संघर्ष सुरू आहे. असाच प्रकार मणिपूर येथे मैतई जातीच्या लोकांना आदिवासी मध्ये सामावून घेण्याचा घाट तेथील सरकारने घातला आहे. यामुळे मैतई व आदिवासी जमाती कुकी, नागा यांच्यात संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच अनेक आदिवासी समाजातील नागरिकांना बलिदान करावे लागते आहे. याच प्रकरणातून आदिवासी महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आली ही कृती मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. आपण स्वतः एक आदिवासी महिला आहात आदिवासींच्या वेदनांची जाणिव आपल्याला आहे त्यामुळे अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी आपण दोषीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. आपण स्वतः पुढाकार घेऊन मणिपूर येथील महिलावर अत्याचार करून धिंड काढणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी आणि आदिवासी समाजाला संरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या मणिपूरचे सरकार बरखास्त करून त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी. अशा आशयाचे निवेदन बिरसा क्रांतीदल उमरखेड यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी बिरसा क्रांती दलाचे तालुका अध्यक्ष भागवत काळे, उपाध्यक्ष बंडूभाऊ ढाकरे, सचिव देवानंद पाचपुते, संघटक अनंता पांडे, मेजर नारायण पिलवंड, अशोक ढोले, शारदा वानोळे, कमलाबाई खंदारे, चंद्रकलाबाई भुरके, हरणाबाई पेटेवाड, लक्ष्मीबाई हातमोडे, लक्ष्मीबाई बडडेवाड, विमलबाई लांडगेवाड, देवराव पेजेवाड, गजानन पिटलेवाड, दगडू तिळेवाड, विक्रम रणमले, सुदाम तारमेकवाढ, निलेश पिलवंड, विजय मिराशे, उमाजी खोकले, संतोष बुरकुले, विजय भुसारे, दिगांबर बोंबले, भगवान बोंबले, भुजंगराव मेंढे, सुभाष बुरकुले, उत्तम रिठे, प्रवीण शिवाजी, दत्ता आढाव, शिवराम तडसे, गणेश शेळके, बाबुराव किरवले, कांताराम मोरे, दत्ता माहुरे, हनुमान पिलवंड, आशा ढोले, ज्योती गारोळे, संगीता वाळके आणि आ.जा. जिल्हा उपाध्यक्ष चरण डोंगरे उपस्थित होते.
351 thoughts on “आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करुन मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी. बिरसा क्रांती दल उमरखेड यांच्यावतीने राष्ट्रपतींना निवेदन.”