स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंतर्गत महा रक्तदान मधे 81 रक्त दात्याने केले रक्तदान

youtube

स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंतर्गत महा रक्तदान 81 रक्त दात्याने केले रक्त दान

 

उमरखेड :-

दि. 15 आज प्रशासनाच्यावतीने तहसिल कार्यालय उमरखेड येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंतर्गत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या महा रक्तदान शिबिरामध्ये ८१ रक्तदात्यानी अमृत महोत्सव दरम्यान रक्तदान केले.
देशभरात स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने तहसिल कार्यालय उमरखेड येथे तालुका प्रशासनाच्या वतीने महा रक्तदान शिबिर आयोजित केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली.उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड़ तहसिलदार आनंद देऊळगावकर, नायब तहसीलदार वैभव पवार, नायब तहसीलदार एस डी पाईकराव , अईनवाड थोरवे,बोतगीरे ,सग्राम गुट्टे ,दिपक चव्हाण, अंकुश नाईक, जय राठोड प्रविण गंगाळे गजानन तलवारे एम एस तिडके मंडल अधिकारी , तलाठी, कोतवाल पोलीस पाटिल, व इतर सर्व कार्यालयीन कर्मचारी यांनी शिबिरा दरम्यान परिश्रम केले. याप्रसंगी सदर शिबिरास अनेक सामाजिक संघटना, शहरातील नागरिक तसेच कामानिमित्त बाहेर गावाहून आलेले नागरिक , कार्यालयातील समस्त कर्मचारी यांनी सहभाग घेऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदान केल्याने आपल्या शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण तर होतेच त्याचबरोबर गरजू व्यक्तींना वेळीच रक्त मिळाल्या मुळे त्याचे प्राण वाचतात त्यामुळे रक्तदान करणे हे सामाजिक कार्य असल्याचे प्रतिपादन तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी केले. सदर शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र घेऊन सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ आरती सुखदेव नाटकर या महा रक्तदान शिबिराचे यशस्वितेकरिता समापन बद्दल आभार प्रकट केले. तहसिलदार आनंद देऊळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले

Google Ad
Google Ad

3 thoughts on “स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंतर्गत महा रक्तदान मधे 81 रक्त दात्याने केले रक्तदान

  1. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!