बिरसा ब्रिगेड च्या तालुका कार्याध्यक्षपदी निलेश पिलवंड.

बिरसा ब्रिगेड च्या तालुका कार्याध्यक्षपदी निलेश पिलवंड.
ढाणकी –
क्रांतिकारी महामानवांची वैचारिक प्रेरणा, तळागाळातील जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याकरिता ढाणकी येथील युवा नेतृत्व, निलेश अन्नपूर्णा लक्ष्मण पिलवंड यांची, बिरसा ब्रिगेडच्या उमरखेड तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड बिरसा ब्रिगेडचे विदर्भ संघटक पांडुरंग व्यवहारे, पुसद तालुकाध्यक्ष मारोती भस्मे व हर्षी सर्कल निरीक्षक राजु पेदेवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
369 thoughts on “बिरसा ब्रिगेड च्या तालुका कार्याध्यक्षपदी निलेश पिलवंड.”