youtube

सहश्रकुंड धबधबा लागला वाहू – पर्यटकांनी केली गर्दी

उमरखेड(प्रतिनिधी)
दि.15_जुलै

उमरखेड तालुक्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे धो धो वाहू लागला. वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर भगवान परशुरामांनी बाण मारून सहस्रकुंडाची निर्मिती केली, अशी आख्यायिका आहे.
पैनगंगा नदीला बाण गंगा म्हणून प्रचलित नावाने ओळखल्या जाते. या ठिकाणी सध्या पर्यटकाची मोठी गर्दी दिसत आहे. या पैनगंगा नदीवरील
मोठ्या उंचावरून पडणाऱ्या सहस्रकुंड
धबधब्याला निसर्गाने सौंदर्याची सहस्त्रहातांनी उधळण केली आहे.
या ठिकाणी निसर्गाचा अद्भुत नजारा पावसाळ्यात या ठिकाणी पहायला मिळते.निश्चितच हे सौंदर्य पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असते.पर्यटकांना आकर्षित करणारा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी असणारी गर्दी पाहता या वर्षी कोरोना विषाणूमुळे पर्यटकांची गर्दी रोडावली असल्याचे चित्र आहे.
निसर्गरम्य सहस्रकुंड धबधबा व निसर्गाचा नजारा पाहण्यासाठी विदर्भ मराठवाड्यातून गर्दी होते. पैनगंगा अभयारण्य यवतमाळ आणि नांदेड जिल्हा यांना विभागते. पैनगंगा अभयारण्याच क्षेत्रफळ सुमारे ३२५ चौ. किलोमीटर इतके आहे. यामध्ये विविध प्राणी व वनस्पती आहेत.
अभयारण्यात पाहण्यास मिळतात. या ठिकाणी येणारे युवा पर्यटक जीव धोक्यात घालून आपला सेल्फीचा नाद पूर्ण करीत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!