लग्न वऱ्हडात आयचर चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार . चालक आरोपीस अटक

लग्न वऱ्हडात आयचर चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .
चालक आरोपीस अटक
उमरखेड :
नातेवाईकाचे लग्न लावून दि 21 मे रोजी दुपारी 3ः 30 वाजताच्या दरम्यान परत येत असताना एका अल्पवयीन मुलीवर आयशर चालकांनी केबिनमध्ये अश्लील कृत्य करून छेडछाड केल्याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून चालक आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे त्यामुळे सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .
पीडित मुलींनी दिलेल्या फिर्यादीनुसार , दि 21 मे रोजी येथील नागापूर रूपाळा येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी वडद ता महागाव येथे गेले असता लग्न लावून दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान मुडाणा मार्ग उमरखेड कडे आयशर 909 क्र .MH 04 DD 8608 या वाहनाने परत येत असताना चिल्ली (ज ) या गावाजवळ चालक नामे वहीद हमीदउल्लाखान पठाण वय 39 वर्ष रा जामा मस्जिद, ढाणकी याने केबिनमध्ये बसलेल्या अल्पवयीन पीडित मुलीवर अश्लील कृत्य करून छेडछाड केल्याचे प्रकार पीडित मुलीने गाडी थांबून गाडीत मागे बसलेल्या आपल्या आईला सदर घटनेची आपत्ती सांगितले .
त्या क्षणी सदर वाहन पोलीस स्टेशन उमरखेड येथे वऱ्हाडासह आणण्यात आले . पिडीत युवतीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध .
भादवी 354 ,354 A ,8 ,12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किशोर घोडेस्वार, पो का नितेश लांडे करीत आहे .
384 thoughts on “लग्न वऱ्हडात आयचर चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार . चालक आरोपीस अटक”