उमरखेड येथे वासवी माता कन्यका परमेश्वरी जयंती व रक्तदान शिबीर संपन्न

youtube

उमरखेड येथे वासवी माता कन्यका परमेश्वरी जयंती व रक्तदान शिबीर संपन्न

उमरखेड – सविता चंद्रे
आज दिनांक 18 मे रोजी आर्य वैश्य समाजाचे आराध्य दैवत माता वासवी कन्या परमेश्वरी जयंतीच्या निमित्य उमरखेड येथील आर्य वैश्य समाजातर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शुभप्रसंगी सकाळी साडेसात वाजता वासवी मातेच्या मूर्तीची शहरातून बस स्टॅन्ड, माहेश्वरी चौक, गांधी चौक, सराफा लाईन, गणपती मंदिर तसेच नाग चौक मार्गे आर्य वैश्य समाज बस स्टॅन्ड समोर पर्यंत वासवी मातेची शोभायात्रा काढण्यात आली या शोभा यात्रेमध्ये महिला भगिनी सह संपूर्ण परिवार समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या शोभायात्रेमध्ये विविध सामाजिक मंडळींनी मूर्तीचे पूजन केले तसेच अनेक ठिकाणी ताक, पाणी, तसेच विविध प्रकारचे थंड पेय सामाजिक कार्यकर्त्यांनी वाटप केले. त्यानंतर आर्य वैश्य समाज येथे आरती करण्यात आली व प्रसादाचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर आर्य वैश्य समाज येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले जवळपास 40 ते 50 रक्तदान केले दात्यांनी व यासाठी आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र कोडगिरवार महिला अध्यक्षा स्वाती निलावार युवा अध्यक्ष व्यंकटेश निलावार उपाध्यक्ष डॉक्टर सचिन मामीडवार सचिव गजानन कोडगीरवार सहसचिव किरण मुक्कावार कोषाध्यक्ष सचिन नीलपवार यांच्यासह सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले व अतिशय उत्साहात शोभायात्रा पार पडली.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “उमरखेड येथे वासवी माता कन्यका परमेश्वरी जयंती व रक्तदान शिबीर संपन्न

  1. Thanks I have recently been looking for info about this subject for a while and yours is the greatest I have discovered so far However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply

  2. I am not sure where youre getting your info but good topic I needs to spend some time learning much more or understanding more Thanks for magnificent info I was looking for this information for my mission

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!