आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करा- उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन ( अन्यथा अशा व गटप्रवर्तक चे सर्व काम बंद ठेवणार) ( आयटक महाराष्ट्र आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना उमरखेड

youtube

आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करा- उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

( अन्यथा अशा व गटप्रवर्तक चे सर्व काम बंद ठेवणार)
( आयटक महाराष्ट्र आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना उमरखेड

उमरखेड

दि.9 जुलै 2025 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक संपामध्ये कृती समितीच्या सर्व संघटना सहभागी असल्यामुळे आशा व गटप्रवर्तकांचे सर्व कामकाज बंद राहणार असल्याबाबतसूचना व मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर,देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेजवार स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारती संयुक्त मंच च्या वतीने दि. 09 जुलै 2025 रोजी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र राज्य कामगार कर्मचारी कृती समितीने या संपामध्ये संपूर्णपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे.
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती राज्यातील उपरोक्त कृती समितीचा भाग आहे. तसेच महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कृती समिती मधील सर्व संघटना या केंद्रीय कामगार संघटनांशी संलग्न आहेत.त्यामुळे या निवेदनाद्वारे आम्ही आपल्याला सुचीत करीत आहोत की महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कृती समितीने 9 जुलै 2025 रोजी या देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून या दिवशी सर्व आशा व गटप्रवर्तक आरोग्याचे कुठलेही काम करणार नाही संपात सहभागी राहील सर्व प्रकारचे आरोग्याचे कामकाज, बंद राहील असा इशारा आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी दिला

आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या राज्य व देशपातळीवरील तातडीच्या मागण्याः

1. आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या, आरोग्य विभागात आशा व गटप्रवर्तकांना 10 टक्के जागा आरक्षीत ठेवा.
2)गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा मिळे पर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन आरोग्य विभागात समायोजन करा व कंत्राटी कर्मचारी बाबत महाराष्ट्र सरकारने पाठविलेला प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूरकरावा.
3)आशा व गटप्रवर्तका ह्या आजारपणात अधवा अपघात झाल्यास उपचारासाठी रू. 10,000/- आर्थिक मदत द्या.
4) आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन दरमहा रु. 26,000/-मानधन/वेतन द्या तसेच गटप्रवर्तका ना दरमहा
5)रू.34,000/- मानधन / वेतन देऊन वेगळा प्रवास भत्ता दया, वरील सर्व मागण्या संदर्भात, आयटक महाराष्ट्र आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक ची सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करा- उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन ( अन्यथा अशा व गटप्रवर्तक चे सर्व काम बंद ठेवणार) ( आयटक महाराष्ट्र आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना उमरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!