हरदडा येथील कुटुंबाचा प्रामाणिकपणा. [मुलीच्या लग्नाचा हरवलेला बस्ता केला परत. व्हाट्सॲप चा सदुपयोग आला कामी.] ढाणकी

youtube

हरदडा येथील कुटुंबाचा प्रामाणिकपणा.

[मुलीच्या लग्नाचा हरवलेला बस्ता केला परत. व्हाट्सॲप चा सदुपयोग आला कामी.]

*ढाणकी

लग्नाचे सगळे तयारीत असताना जेव्हा त्यांच्या मुलीच्या लग्नाचा सर्व महत्वाचा बस्ता तो रस्त्यात हरवला. परंतु व्हाट्सॲप सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग केल्याने तो बस्ता परत मिळण्यास मदत झाली असून, सापडलेला बस्ता परत करत हरदडा येथील श्रीरंग तुकाराम पायगन व प्रफुल पंडित पायगन या कुटुंबाने आपल्या प्रामाणिकतेचा परिचय देत तब्बल ३० ते ४० हजार रुपयाचा बस्ता परत केला आहे.
ढाणकी येथील शिवकुमार हुडगे हे मुलीच्या लग्नाचा बस्ता खरेदी करून चारचाकी वाहनाने हदगाव ते ढाणकी रस्त्याने येत असताना, मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाच्या टपावरून बस्त्याचा गट्टा रस्त्यात पडला. ढाणकी येथे घरी आल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. रात्रीलाच परत जावून त्यांनी या रस्त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु बस्त्याचा गट्टा सापडला नाही. मुलीचे लग्न अवघ्या सात दिवसावर येऊन ठेपले होते. वेळेवरच बस्ता हरवल्याने मुलीच्या कुटुंबाची चिंता वाढली होती.
अशातच पत्रकार नागेश महाजन यांनी मुलीच्या लग्नाचा बस्ता हरवल्याची सविस्तर पोस्ट व्हाट्सअप सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. त्यांच्या ढाणकी येथील पत्रकार मित्रांनी तसेच इतरांनी देखील ही पोस्ट लगेच इतर ग्रुपवर फॉरवर्ड केली. अशातच स्वप्निल चिकाटे, ओम खोपे व हरदडा येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रणिता कांबळे यांनी तुमचा बस्ता सुरक्षित असून, हरदडा येथील पायगन कुटुंब तो बस्ता खात्री करून ज्याचा आहे त्याला परत द्यायला तयार आहे असे कळविले. त्यानंतर खात्री करून पायगन कुटुंबांनी आपल्या प्रामाणिकतेचा परिचय देत हा बस्ता सुरक्षितपणे मुलीच्या कुटुंबाला परत केला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रणिता कांबळे, ओम खोपे, धीरज वानखेडे, श्रीरंग पायगन , तुकाराम पायगन, प्रफुल पायगन, नागेश महाजन, शिवकुमार हुडगे, माधवी हुडगे , हरी , विनोद हुडगे व हरदडा येथील नागरिक उपस्थित होते.
सामाजिक माध्यमांचा उपयोग केवळ अफवा पसरवण्यासाठी नव्हे, तर समाजहितासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी देखील केला जावू शकतो व यातून अनेक अडचणी सुटू शकतात.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!