सहा महिन्याच्या मुदतवाढी नंतर बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त ; प्रशासक हिरुडकर यांनी स्विकारला पदभार 

youtube

सहा महिन्याच्या मुदतवाढी नंतर बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त ; प्रशासक हिरुडकर यांनी स्विकारला पदभार

उमरखेड –
बाजार समिति संचालक मंडळ यांची ३ डिसेंबर २०१८ या वर्षी निवडणुक झाली होती या संचालक मंडळाचा कारभार ३ डिसेंबर २०२३ रोजी संपुष्टात आला होता मात्र सभापती बाळासाहेब चंद्रे पाटिल संचालक मंडळाने शासनाकडे मुदत वाढ मागितली असतांना यावर शासनाने विचार करुन पुन्हा या मंडळाला पुन्हा २ जुन पर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती यावर न थांबता संचालकांनी पुन्हा शासनाकडे मुदतवाढ मिळावी म्हणून मनधरनी केली होती शिवाय नागपुर खंडपिठा मध्ये धाव घेतली होती लोकसभेची आंचार संहिता ५ जुन पर्यंत असल्याने प्रशासकीय नियमाववलीत खंड पडला होता मात्र प्रशासनाने सखोलपने या बाबतीत लक्ष घालुन ६ जुन रोजी प्रशासक नियुक्तीचे आदेश जिल्हा निंबधक नानासाहेब चव्हाण यांचे कडे अधिसुचना दिल्या नंतर गुरुवारी तालुका निबंधक विलास हिरुडकर यांनी समिति मध्ये प्रशासकीय पद्भार स्विकार ला आहे
———————————–
– कोट –
उमरखेड बाजार समिती संचालक मंडळाने संघटीत पणे होऊन कार्यालयीन कर्मचारी भरणा मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करुन बेकायदेशिर पणे केलेली नौकर भरती केली आहे , मुदतवाढी दरम्याण केलेली पद भरती वास्तविक हि पद्धतच मुळातच चुकीची आहे
या बाबतीत ठोस पुरावे आहेत
समिती मध्ये पुढे पक्षातील काही तज्ञ व्यक्तींना प्रशासकीय मंडळ म्हणून पाठविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे तसेच नियमबाहय कर्मचारी पद भरती रद्द करु या बाबतीत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरुच आहे
– नामदेव ससाने
आमदार , उमरखेड
———————————–
बाजार समिति प्रशासक पदाची सुत्र विलास हिरुडकर यांनी यांनी स्विकारता च कार्यालयान कर्मचारी याची तातडीची बैठक घेऊन कार्यालयीन कामाचा आढावा घेऊन माहिती जानुन घेतली हिरुडकर यांचे स्वागत कर्मचारी यानी केले त्यावेळी सचिव संदिप जाधव , सुधीर शिन्दे , अशोक कनवाळे , आनंद जगताप , सुनिल टिळेवाड , प्रविनजंन राठोड , प्रविण देवसरकर , देविदास जंगले , हरिचंद्र राठोड , गजानन कदम या सह विनायक कदम , रंगराव कदम , दतात्रय कदम हे सर्व उपस्थित होते

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!