हिंदूच्या मतावर सत्ता गाजवणाऱ्या हिंदूची गळचेपी करत आहेत भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा.
हिंदूंच्या मतावर सत्ता गाजविणारेच हिंदूंची गळचेपी करत आहेत : भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा
प्रतिनिधी / 18 डिसेंबर
यवतमाळ : जिल्ह्यात पोलिसांना “सदरक्षणाय खलनिघ्रनाय ” या ब्रिदाचा विसर पडला. त्रिपुराच्या घटनेनंतर विशिष्ट समाजाला निषेध मोर्चे काढण्यास परवानगी देणारे पोलीस, पुसदमध्ये शांततेत निषेध करण्यास परवानगी नाकारतात, खरंतर पोलीस यंत्रणा तृष्टीकरणासाठी वापरण्यात येत आहे आणि म्हणूनच उमरखेड पर्यंत दंगलीचे लोळ पोहोचते हे या सरकारचे अपयश आहे. ही हिंदूंची गळचेपी आहे आणि हे काम कालपर्यंत हिंदूंच्या मतावर सत्ता गाजविणारे करत आहेत, हे मराठी माणसाचे दुर्दैव आहे, असे परखड मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी व्यक्त केले.
काल रात्री 9 च्या दरम्यान उमरखेड शहरात दुकानांची जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली, ही दंगल प्रायोजित होती, आणि दंगलखोरांची ही हिम्मत फक्त आणि फक्त सरकारच्या हिंदुद्वेष्ट्या धोरणामुळे होत आहे. त्रिपुरात काहीतरी झाल्याचे फक्त सांगितल्या जाते, त्याची शहनिशा न करता अमरावती, नांदेड, अकोला मालेगाव पुसद अशा अनेक ठिकाणी दंगली घडतात, पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत दंगलखोरांची मजल जाते हे या सरकारचे अपयश आहे.
काळी मधे हत्या होते, त्या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी मज्जाव केला जातो, कलम 144 तातडीने लागू केल्या जाते त्याच जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक त्रिपुरातील तथाकथित प्रकरणाचा निषेध नोंदविण्यास परवानगी देतात, ढाणकी सारख्या ठिकाणी “दास्ता न रहेगी दस्तानोमे !” असे फलक झळकावून हिंदूंना डिवचल्या जाते, हे प्रकरण का घडत आहेत? हे जनता जाणून आहे. दुःख या गोष्टीचे आहे, हिंदूंच्या मतांवर सत्ता गाजविणारे ह्या सर्व गोष्टी घडू देत आहेत. हिंदूंची ही गळचेपी हिंदू विसरणार नाहीत लवकरच बॅलेट मधून याचे उत्तर देतील असे परखड मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी व्यक्त केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक कुणासाठी काम करीत आहेत ?
जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक भुजबळ आल्यापासून संघटीत गुन्हेगारी यवतमाळ पासुन पुसद उमरखेड या टोकापर्यंत पोहोचली. जिल्ह्यात खुलेआम गांजा तस्करी, गुटखा तस्करी, रेती तस्करी, गौ तस्करी होत आहे. वाहतूक शाखेची प्रत्येक उपविभागात वसुली सुरू आहे, त्यासाठी अनेक वाझें नेमले आहेत. अवैध धंदे जोमाने सुरू आहेत, हे पोलिसांचे फेल्युअर आहे. पुसदमध्ये 20000 लोकांचा मोर्चा निघतो, मात्र शांततेत आणि उमरखेड मध्ये काही भुरटे प्रचंड प्रमाणात जाळपोळ, तोडफोड करतात तेव्हा इंटेलिजन्स डिपार्टमेंट काय करते? पोलिसांचा उद्धेश नेमका काय आहे? पोलीस टार्गेट करून सुपारी घेतल्यासारखे काम तर करीत नाहीत ना? कुणाच्यातरी सांगण्यावरून कुणावरती कारवाई करायची आणि निरपराध लोकांना राजकीय सुडापोटी तुरुंगात डांबायचे आणि अपराध्याना मोकाट सोडायचे ही कसली पोलिसगिरी ? ही तर दादागिरी ? पोलीस अधीक्षक नेमकं कुणासाठी काम करीत आहेत? असे अनेक सवाल भुतडा यांनी उपस्थित केले.
271 thoughts on “हिंदूच्या मतावर सत्ता गाजवणाऱ्या हिंदूची गळचेपी करत आहेत भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा.”