उमरखेड नगरपरिषद मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न

youtube

– उमरखेड येथील नगरपरिषद मंगल कार्यालय येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधीत दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी उमरखेड तालुक्यातील उमरखेड राजस्व मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजीत करण्यांत आला होता. या कार्यक्रमाचे उद्धघाटन हे उमरखेड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री किसनरावजी वानखेडे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यांत आले. या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा समन्वयक मा. नितिनजी भुतडा, नगराध्यक्षा सौ. तेजश्री जैन, उपविभागीय अधिकारी श्री सखाराम मुळे, तहसिलदार श्री राजेश सुरडकर, तहसिलदार श्री रोहित शिंदे, मुख्याधिकारी श्री अजय कुरवाडे, तालुका कृषी अधिकारी श्री वडकुते, भुमीअभिलेख विभागाचे श्री आडे, वित्तीय संस्थेचे प्रतिनिधी, महावितरण, एस.टी. महामंडळ चे प्रतिनीधी, पोलीस विभाग, नगर परिषद, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण व संजय गांधी नायब तहसिलदार श्री राम पंडीत, शेतीनिष्ठ शेतकरी श्री अशोकराव वानखेडे, सर्व नगर परिष्द सदस्य, पोलीस पाटील, सरपंच व सर्व प्रशासकिय विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार बंधु हजर होते. या शिबीरामध्ये सर्व प्रकारचे 3232 दाखले वितरीत करण्यांत आले तसेच श्रावणबाळ सेवा योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशनकार्ड, ईमारत व बांधकाम चे कामगार यांना ओळखपत्र, आरोग्य तपासणी, कृषी विभागाच्या योजनांची माहिती, भूमी अभिलेख विभागाच्या योजना ईत्यादी लाभाचे वितरण करण्यांत आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता उपविभागीय अधिकारी श्री सखाराम मुळे व तहसिलदार श्री राजेश सुरडकर यांचे मार्गदर्शनात मंडळ अधिकारी उमरखेड संजय वाघमारे, ग्राम महसूल अधिकारी गणपती क्षीरसागर, प्रकाश हापसे, अनिकेत शिरसाट, संजय केंद्रे, तसेच महसूल सेवक गोपाल काळबांडे, गोपाल सरकाळे, वैष्णवी शिंदे, दिक्षा लोमटे यांनी पुढाकार घेउन कार्यक्रम यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!