ढाणकी सोसायटीच्या अध्यक्षपदी बंटी वाळके तर उपाध्यक्ष पदी इबाददुल्लाखा पठाण.

youtube

ढाणकी सोसायटीच्या अध्यक्षपदी बंटी वाळके तर उपाध्यक्ष पदी इबाददुल्लाखा पठाण.

ढाणकी प्रतिनिधी –
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या ढाणकी सोसायटीच्या अध्यक्षपदी तरुण तडफदार युवा नेते बंटी वाळके तर उपाध्यक्षपदी इबादुल्ला खा पठाण यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच पार पडलेल्या ढाणकी ग्राम विविध सहकारी सोसायटीच्या तेरा संचालक पदाच्या निवडणुकीत 13 पैकी 13 जागेवर विजय मिळवला होता.दिनांक 15 जून रोजी बुधवार ला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड झाली. अध्यक्षपदासाठी बंटी वाळके आणि उपाध्यक्षपदासाठी इबादुल्ला खा पठाण यांचे नामांकन दाखल असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उपाध्यक्ष पदासाठी तीन संचालक उत्सुक होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी इच्छुक बंटी वाळके नावावर शिक्कामोर्तब केला. यावेळी संचालक राहुल चंद्रे , विठ्ठल उपेवाड, शिवाजी वैद्य, देवराव राठोड, अनिल राठोड, गजानन पाटील गाडेकर, पंकज शेषराव नरवाडे, लक्ष्‍मीबाई मारोती गुडेटवार, जयश्री विनय कोडगीरवार, तुळशीराम गायकवाड, इत्यादी सहकारी सोसायटी चे संचालक उपस्थित होते. या निवडीने शेतकऱ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “ढाणकी सोसायटीच्या अध्यक्षपदी बंटी वाळके तर उपाध्यक्ष पदी इबाददुल्लाखा पठाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!