सरसगट हेक्ट्री 50 हजार नुकसान भरपाई द्या. शिवसेनेची लेखी निवेदनातून मागणी. शिवसेना ठाकरे गटाकडुन निवेदन.
सरसगट हेक्ट्री 50 हजार नुकसान भरपाई द्या.
शिवसेनेची लेखी निवेदनातून मागणी.
शिवसेना ठाकरे गटाकडुन निवेदन
उमरखेड –
तालुक्यात 21 व 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली त्या मध्ये शेती पीका सह शेत जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शेतकरी पूर्णतः हतबल झाला आधीच दुबार तर काही ठिकाणी तीबार पेरणी करावी लागली सोयाबीन ,ऊस मूग उडीद तूर व फळ बाग उद्धवस्त होऊन मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांना त्यातून उभारी मिळावी यासाठी शासनाने तातडीने सरसगट हेक्ट्री 50 हजार अनुदान द्यावे, तसेच अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील घरांची पड झड होऊन नुकसान झाले अशांना सुध्दा तात्काळ मदत द्यावी सातही महसूल मंडळातील नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी शिवसेना ठाकरे गटांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना लेखी निवेदन शिवसेना ठाकरे गटाने दिले आहे. यावेळी सेनेचे ऍड बळीराम मुटकुळे,तालुका सचिव संतोष जाधव, राजेश खामनेकर, सतीश नाईक,गजेंद्र ठाकरे,संभाजी गोरटकर,नागेश गोरेवाड, शे एजाज पटेल, शैलेश जैन,नितीन शिंदे,अजय नरवाडे ,गोपीचंद दोडके,माजी नगर सेविका रेखा गवळे,कैलास कदम याचे सह मोठया प्रमाणात शिवसेनिक उपस्थित होते.