उमरखेड विधानसभेत मतदान शांततेत  55% मतदान झाल्याचा अंदाज व शेतकरी बांधवांनी बैलगाडी साजवुन लोकशाही चा उत्सव साजरा करीत मिरवणूक काढली.

youtube

हिंगोली लोकसभा मतदारसंघ

उमरखेड विधानसभेत मतदान शांततेत  55% मतदान झाल्याचा अंदाज – व शेतकरी बांधवांनी बैलगाडी सजवून लोकशाहीचा उत्सव साजरा करीत मिरवणूक काढण्यात आली

प्रतिनिधी
उमरखेड :

आज दुसऱ्या टप्प्यात झालेल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विदर्भातील एकमेव उमरखेड विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 52 टक्के मतदान झाले होते तर आज संपूर्ण मतदान हे अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडले .

भर उन्हातही मतदारांनी मतदान करण्याचे औचित्य दाखविले मात्र दरवेळेस 70 टक्के च्या वर मतदान करणारा हा उमरखेड विधानसभा मतदारसंघ यावेळी 55 टक्क्यावर मतदान झाल्याने याचा उमेदवाराच्या विजयाच्या गणिताला बिघडण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे .
आज सकाळपासूनच उमरखेड शहरातील विविध मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजेपर्यंत गर्दी दिसली मात्र त्यानंतर उन्हाचा तडाका वाढला व गर्दी पसरण्याचे दिसून आले हे चित्र संपूर्ण तालुक्यातील खेडेगाव सुद्धा दिसून आले मात्र जसे जसे ऊन कमी झाले तसे तसे मतदानाची टक्केवारी वाढत गेली .मात्र या मतदान करण्याच्या प्रक्रिये वेळेस एक विशिष्ट बाब ढाणकी शहरात दिसून आली चक्क शेतकऱ्याने आपल्या बैलबंडीला सजवुन “मी लोकशाहीचा उत्सव साजरा करीत आहो ” आपण पण करा “या आशयाचे बॅनर घेऊन मतदान केंद्रावर थेट बैलगाडी घेऊन पोहोचले होते . यावेळी उमरखेड विधानसभेत उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!