निवडणूक काळातील वाहन तपासणी नाक्यावर वाद होऊन कर्मचाऱ्याचा मोबाईल फोडला ; महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलासह समर्थकावर गुन्हे दाखल कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

youtube

निवडणूक काळातील वाहन तपासणी नाक्यावर वाद होऊन कर्मचाऱ्याचा मोबाईल फोडला ; महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलासह समर्थकावर गुन्हे दाखल कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर
२३ एप्रील
उमरखेड
दुसऱ्या टप्प्यातील हिंगोली लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक होऊ घातली असतांना निवडणुक प्रशासन विभागाकडून एस एस टी तपासणी नाके ठीक ठिकाणी स्थापन केली असतांना नांदेड – उमरखेड मार्लेगांव नजीक या तपासणी नाक्यावर तपासणी पथकाकडून हदगांव या ठिकाणा वरून उमरखेड येणाऱ्या वाहन क्र एम एच २६ – बी एक्स २९२९ हे वाहन आले असतांना तपासणी नाक्यावरी ल कर्मचारी यांनी संबंधात वाहन तपासणी साठी थांबविले असता वाहनात बसुन असलेल्यां नी वाहन न तपासू देता वाद घातला आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्या चा मोबाईल फोडुन शासकीय कामात हुज्जत घालुन अडथळा आनला हि घटना तपासणी नाक्यावर २३ एप्रिल रोजी दुपारचे दरम्यान घडली या प्रकरणी हिंगोली लोकसभा मतदार संघातील ( उ बा ठा ) महाविकास आघाडी चे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुत्रा सह अन्य समर्थकांवर गुन्हे दाखल झाले आहे ऐवढेच नव्हे तर संबंधीत सर्वच आरोपी त्या ठिकाणा वरून पळ काढुन उमरखेड शहरात आले असता नाक्यावर पोलीस कर्मचारी उपस्थित असतांना ऐवढा मोठा प्रकार घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतांना दिसुन आला आहे
गुरुवारी दुपारी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार माजी आमदार नागेश पाटिल आष्टीकर यांचे चिरजिंव कृष्णा पाटील आष्टीकर हे दुपारी दिड वाजता च्या दरम्याण स्वतः कडिल वाहन क्रमांक एम एच २६ – बि .एक्स २९ २९ घेऊन हदगाव – उमरखेड येत होते त्यांना चेक पोस्ट च्या कर्मचारी यांनी वाहन थांबवा असे म्हटल्या नंतर वादाला सुरुवात झाली आणि कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी संघर्षशिल टेंबरे यांच्या कडिल मोबाईल हिसकाऊन फोडला आणि शिवीगाळ करित प्रशासनातील कार्यात अडथळा आनून सहकारी कर्मचारी रामकिसन शिंदे यांच्या गळ्यातील ओळख पत्र हिसकाविले तेंव्हा आरोपी यांच्या सह अन्य समर्थक यांच्या वाहने या ठिकाणी थांबलेले होते समर्थक जास्त असल्याने कर्तव्या वरिल कर्मचारी कमालीचे धास्तावले होते अशा आशयाची तक्रार उमरखेड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी रामकिसन शिंदे ( ४९ ) राहणार गोकुळ नगर उमरखेड यांनी उमरखेड पोलिसात दिली असून त्यांच्यासोबत कर्तव्यावर असलेले कर्मचारी मारोतराव काकडे , प्रकाश पवार , अशोक सूर्य , राजरतन नवसागरे तसेच पोलीस शिपाई संघर्षशिल टेंबरे व गजानन आडे असे कर्मचारी नाकाबंदी साठी कर्तव्यावर हजर होते या सर्वांनी घडलेला प्रकार पोलीसात कथन केला
घटनेची फिर्याद कर्मचारी रामकिसन शिंदे ( ४९ ) यांनी दिला त्यावरून ठाणेदार संजय सोळंके यांनी लोकसभा उमेदवार माजी आमदार पुत्र कृष्णा पाटिल आष्टीकर यांच्या सह पसार झालेल्या सहकारी यांच्यावर या प्रकरणी विविध कलमांन्वे गुन्हे दाखल केले आहेत संबंधीत आरोपी सर्व जनांचा शोध उमरखेड पोलीस घेत आहेत

स्थिर सर्वेक्षण पथक फोटो सोबत

Google Ad
Google Ad

1 thought on “निवडणूक काळातील वाहन तपासणी नाक्यावर वाद होऊन कर्मचाऱ्याचा मोबाईल फोडला ; महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलासह समर्थकावर गुन्हे दाखल कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  1. certainly like your website but you need to take a look at the spelling on quite a few of your posts Many of them are rife with spelling problems and I find it very troublesome to inform the reality nevertheless I will definitely come back again

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!