ढाणकी येथे शांतता कमिटीची सभा व सामाजिक कार्य करणाऱ्याचा सन्मान व अनाथ नरेंद्रला पाच हजार व एक ड्रेसची मदत – ठाणेदार सुजाता बनसोड

youtube

ढाणकी येथे शांतता कमिटीची सभा व सामाजिक कार्य करणाऱ्याचा सन्मान व अनाथ नरेंद्रला पाच हजार व एक ड्रेसची मदत – ठाणेदार सुजाता बनसोड

 

ढाणकी

 

सन व उत्सवाहाची  सुरूवात गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर, बिटरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता सभेचे आयोजन ढाणकी  येथे करण्यात आले होते. यावर्षीची ढाणकी येथील शांतता कमिटीची सभा अनोख्या पद्धतीने साजरी झाली. बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला ठाणेदार सुजाता बनसोड यांनी, सभेसाठी उपस्थित शहरातील नेतेमंडळी, विविध पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना राखी बांधून शांतता कमिटीची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर शहरातील काही सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचा, बिटरगांव पोलीस स्टेशन तर्फे यथोचित मान सन्मान व सत्कार करण्यात आला. यामध्ये संपूर्ण श्रावण महिना ढाणकी शहरात वैद्यकीय सेवा मोफत देणारे डॉक्टर दिनेश जयस्वाल, यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शहरातील मृत किंवा रुग्ण यांना स्वतःच्या गाडीने अगदी कमी दरात सेवा पुरवणाऱ्या, खाजगी वाहनधारक अनिल तोडक यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पोलीस स्टेशनच्या कुठल्याही कार्यक्रमात साऊंड व खुर्ची याची व्यवस्था करणारे सतीश मुनेश्वर यांचा सत्कार करण्यात आला. आणि विशेष उल्लेखनीय ढाणकी येथील कांचन गुलाबसिंह ठाकुर यांची, बस प्रवासात चार चोरट्यांनी पर्स चोरी केली, त्या चोरांना एका महिलेने हिमतीने पोलिसांच्या ताब्यात दिल्याबद्दल, त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
आणि नुकतेच ढाणकीतील कविता नारमवाड या महिलेचा तिच्या पतीने निर्घृण खून केला, ती महिला गेल्यानंतर तिचा एकुलता एक मुलगा नरेंद्र हा अनाथ झाला, नरेंद्रला बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे ५००० रुपये व एक ड्रेस अशी मदत सुजाता बनसोड यांनी केली. तर राखी बांधल्यानंतर आलेली ओवाळणी जवळपास १० हजार ही सुद्धा आर्थिक मदत नरेंद्रला केली. याचबरोबर ठाणेदार सुजाता बनसोड यांनी उपस्थितांना आवाहन सुद्धा केले की, मायेच्या मायेला मुकलेल्या नरेंद्र यास, त्याच्या भविष्याकरिता दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन नक्कीच मदत करावी.
उपस्थित सर्वपक्षीय मान्यवरांनी आपापले विचार व्यक्त केले. ढाणकीतील नागरिक हे जबाबदार नागरिक असून, ते नक्कीच पोलीस प्रशासनाला सहकार्य करतील अशी खात्री असून, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी. कायदा हा जात,धर्म, गरीब, श्रीमंत कुणी न बघता सर्वांना समान असतो. त्यामुळे कायदा कुणी हाती घेऊ नये. आणि सर्व सण उत्सव हे एकात्मतेने व बंधुभावाने पार पाडावे. असे विचार ठाणेदार सुजाता बनसोड यांनी यावेळी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, उपनगराध्यक्ष जहीर जमीनदार, स्वीकृत नगरसेवक खाजा कुरेशी, माजी जि. प. सदस्य रामराव गायकवाड, रमेश गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघ चालक आनंदराव चंद्रे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अॅड. अनिल येरावार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नागेश महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीट जमादार मोहन चाटे, दत्ता कुसराम, देविदास हाके, निलेश भालेराव, होमगार्ड वाढवे यासह बिटरगाव पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

140 thoughts on “ढाणकी येथे शांतता कमिटीची सभा व सामाजिक कार्य करणाऱ्याचा सन्मान व अनाथ नरेंद्रला पाच हजार व एक ड्रेसची मदत – ठाणेदार सुजाता बनसोड

  1. Предлагаем услуги профессиональных инженеров офицальной мастерской.
    Еслли вы искали ремонт ноутбуков lenovo, можете посмотреть на сайте: ремонт ноутбуков lenovo адреса
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

  2. Cryptocurrency tax news
    As the world of digital currencies continues to expand, the conversation surrounding their regulation becomes increasingly critical.
    Authorities around the globe are attempting to establish
    frameworks and guidelines. This efforts are not just
    about control but also aim to create an environment of
    clarity and security. As innovations unfold, the landscape grows
    more complex.
    Many individuals are left wondering how these changes will impact their holdings.

    Recent legislative moves suggest that regulators are
    keen to address the intricacies of this financial domain. It’s a
    dance of adaptation, where every step can mean a significant shift in how digital wealth is perceived and managed.
    The rhythm of this evolution is fast-paced, making it imperative for stakeholders to stay
    informed.
    In this fast-evolving sphere, understanding the implications behind recent
    legislative shifts is essential. With diverse interpretations and varying approaches across different regions,
    it becomes crucial for participants to navigate this intricate system.
    Relief or challenges are often just around the corner, depending on the direction of policies.
    Thus, staying updated is not merely beneficial; it’s necessary
    for survival in this dynamic environment.

    my homepage … https://cryptolake.online/btc/

  3. Предлагаем услуги профессиональных инженеров офицальной мастерской.
    Еслли вы искали сервисный центр philips в москве, можете посмотреть на сайте: официальный сервисный центр philips
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!

  4. Предлагаем услуги профессиональных инженеров офицальной мастерской.
    Еслли вы искали сервисный центр philips в москве, можете посмотреть на сайте: сервисный центр philips
    Наши мастера оперативно устранят неисправности вашего устройства в сервисе или с выездом на дом!