चुरमुरा येथे विज पडून 21 शेळ्या ठार

चुरमुरा येथे विज पडून 21 शेळ्या ठार
उमरखेड :- तालुक्यातील चुरमुरा येथे आज दिनांक १७ जून रोजी दुपारी २ ते २. ३० च्या दरम्यान विज पडून २२ शेळ्या ठार झाल्या.
चुरमुरा येथील घाटोळी शिवारात गुराखी समाधान फुलसिंग राठोड हा असंख्य शेळ्या चारण्यास घेऊन गेला असतास दुपारी २ ते २. ३० वाजता च्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन विज पडून २२ शेळ्या ठार झाल्या असुन अंदाजे २. ३० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, विज पडल्याचे वृत्त कळताच तहसीलदार राजेश सुरडकर घटनास्थळी रवाना झाले असुन त्यांनी विज पडललेल्या ठिकाणची पहाणी करून मृत पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा करून महसुल गावातील नागरीकांना कोणत्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळेल हे पहाणे गरजेचे आहे
263 thoughts on “चुरमुरा येथे विज पडून 21 शेळ्या ठार”