नांदेड व हिंगोली खासदारांचा विठ्ठल बागेत सत्कार ! लोकनेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचे कडून आयोजन

youtube

नांदेड व हिंगोली खासदारांचा विठ्ठल बागेत सत्कार !

लोकनेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचे कडून आयोजन !

प्रतिनिधी
उमरखेड :

उमरखेड विधानसभेतील लोकनेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी आज त्यांच्या विठ्ठल बाग निवासस्थानी नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण व हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा स्नेह मिलन सोहळा आयोजित केला होता .

याप्रसंगी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .

यावेळी बोलताना प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगितले की ,हा सोहळा आयोजित करण्याचे कारण म्हणजे जीवाभावातील जवळचे नातेवाईक हे खासदार झाले आणि सगळ्या सोयऱ्यांनी त्यांचा सत्कार घेणं हे गरजेचे असतं त्यामुळे हा सोहळा स्विकारसाठी त्यांना आम्ही आमंत्रित केले असता त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आमचा सत्कार स्वीकारण्यासाठी आज विठ्ठल बागेत आले .
तर यावेळी बोलतांना नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी मी जरी नांदेडचा खासदार असलो तरी उमरखेड विधानसभेचा विकास करण्यासाठी नेहमी आमच्या महाविकास आघाडीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना प्रत्येक क्षणी मदत करणार असल्याची ग्वाही दिली.

नागेश पाटील अष्टीकर यांनी सांगितले की, उमरखेड विधानसभेतून भरघोस मतांनी मला आघाडी मिळाली त्यामुळे उमरखेडवर माझे विशेष लक्ष राहील यापुढे प्रकाश पाटील देवसरकर यांच्या माध्यमातून उमरखेड तालुक्याचा विकास करण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी माजी आमदार विजयराव खडसे , माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कृष्णा पाटील देवसरकर, बाबुराव कदम , भीमराव पाटील , माजी सभापती प्रज्ञानंद खडसे ,युवराज पाटील देवसरकर, शाहुराज पाटील देवसरकर, निकिताताई प्रकाश पाटील देवसरकर , गजानन सुरोशे , चंद्रकांत शहा ,बबनराव कदम, विठ्ठलराव राणे यांचे सह प्रकाश पाटील देवसरकर यांचे समर्थक व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते . या सत्कार सोहळ्याला पाहून दोन्ही खासदार यांनी प्रकाश पाटील देवसरकर यांचे आभार मानले .

Google Ad
Google Ad

3 thoughts on “नांदेड व हिंगोली खासदारांचा विठ्ठल बागेत सत्कार ! लोकनेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचे कडून आयोजन

  1. you are in reality a good webmaster The website loading velocity is amazing It sort of feels that youre doing any distinctive trick Also The contents are masterwork you have done a fantastic job in this topic

  2. Its like you read my mind You appear to know so much about this like you wrote the book in it or something I think that you can do with a few pics to drive the message home a little bit but instead of that this is excellent blog A fantastic read Ill certainly be back

  3. I loved as much as you will receive carried out right here The sketch is tasteful your authored subject matter stylish nonetheless you command get got an edginess over that you wish be delivering the following unwell unquestionably come further formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!