youtube

मनोरुग्णांचे कोरोना लसीकरण होईल का ?
ढाणकी :-

कोरोना पासून बचाव करण्यासाठी शासन , प्रशासन व नागरीक विविध उपाय योजना करीत आहेत व आपण कोरोना पासून कसे सुरक्षीत राहु याची काळजी घेत आहेत . परंतू दररोज भटकंती करुन मिळेल ते खाणारे जागा मिळेल तिथे झोपणाऱ्या मनोरुग्णांचे काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे .
शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु केले नागरीक लसीकरणा साठी रांगेत उभे राहुन लस घेत आहेत मग या मनोरुग्णांचे लसीकरणाची जवाबदारी कोण घेणार असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थीत होतो . प्रत्येक खेडयात मनोरुग्ण असतो तर शहराच्या ठिकाणी मनोरुग्णांची संख्या जास्त आहे . त्या मनोरुग्णांच्या तोंडाला ना मास्क ना सॅनीटायझर , ना अंघोळ , ना कपडे अशा अवस्थेर मनोरूग्ण वावरतो . जर मनोरुग्ण पॉजीटीव्ह झाला तर त्याला उपचारासाठी दवाखाण्यात कोण नेणार . तो तसाच जागा मिळेल तिथे झोपणार आणि दये पोटी ज्यांनी खायाला दिले ते खाणार मग त्या मनोरुग्णा मार्फत कोरोना चा फैलाव होणार नाही का ? मनोरुग्ण व पण अनेकांच्या संपर्कात येतो . म्हणून मनोरुग्णांचे पण कोरोना लसीकरण होणे गरजेचे आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!