9 वर्षा पासून बेपत्ता असलेला मारूफ अखेर आज घरी पोहचला नंददीप च्या कार्याला यश यवतमाळ

9 वर्षा पासून बेपत्ता असलेला मारूफ अखेर आज घरी पोहचला नंददीप च्या कार्याला यश
यवतमाळ
तिन दिवसा अगोदर निशांत भाऊ सायरे यांचा प्रवास उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर पर्यंत पोहचला तेथे पोहोचल्यावर कळाले की महारुफ चे घर उत्तर प्रदेश राज्यात परंतु सगळे लोक कामासाठी मुंबई ला गेले आहेत व कोणाकडे फोन नाही माहरूफचे आई बाबा व भाऊ शोधायचेच हा द्रूड निश्चय निशांत ने केला आणी मार्ग डायरेक्ट मुंबई वळवीला आई वडिलांचे काही पत्ते घेतले आणी थेट उत्तर प्रदेश ते मूंब्ई पोहचले मूंब्ई मध्ये पोहचले
मूंब्ई मध्ये पुणे पिंपरी चिंचवड भागात पोहचले शेवटी शोध लागलाच आज 9 वर्षा आधी वडील उद्देश चौधरी यांच्या ताब्यातून तो निघून गेला असल्याचे कळाले पुणे पिंपरी चिंचवड भागामध्ये त्याची मिसिंग कंप्लेंट आहे. त्याला सात बहिण भाऊ आहेत. कुद्दुस चौधरी यांना दोन पत्नी आहेत. भाऊ साबूत यांनी त्यांची
जबाबदारी स्विकारली. उत्तर प्रदेश मधून कामाच्या निमित्ताने आलेले सगळे त्यांचे भाऊबंद मात्र मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये स्थायिक झालेले असल्याचे कळाले आहे
*अखेर माहरूपचे घर परीवार सापडला आणी माहरूफला परीवारांच्या ताब्यात दिले*
*हाच तो माहरूफ ज्याने माझेवर प्राणघातक हल्ला केला होता सूदैवाने मी बचावलो माहरूफने असे काय केले होते माहरूफ च्या अंगावर सहा शर्ट तिन पँन्ट खिशात भरलेल्या पन्या व मोबाईल चार्जिंग केबल जेष्ठ नागरिक मंडळाने नंददीपला दिलेल्या ऐंबूलंस मध्ये घेऊन जात असतांना ऐंबूलंस मध्ये ड्राइवर शिटला लागून जाळी बसवून होती मी गाडी चालवीत होतो त्या जाळीच्या वरून माहरूफ ने मोबाईल चार्चींग केबल टाकली व माझा गळा आवळन्याचा प्रयत्न केला सूदैवाने ति केबल मला आरशात दिसली मी ती केबल चालू गाडी मध्ये हातात पकडली गाडी साईडला थांबवली आणि माहरूफ दोन्ही हात बांधून बूलठाणा पर्यंत गेलो असा हाच तो माहरूफ*
आज चार वर्षांपूर्वी लाडखेड बस स्टेशनच्या मागे कचऱ्यात फेकलेले अन्न खाताना नंददीप ने माहरूफला ताब्यात घेतले होते लाडखेड पोलीस स्टेशन चे रितसर पोलीस पत्र घेऊन माहरूफला बूलठाणा येथील दिव्य सेवा प्रकल्पात निवारा देन्यात आला होता जेव्हा नंददीप फाऊंडेशन चे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र सूरू झाले तेव्हा बूलठाणा येथून माहरूफला पूढील उपचारा साठी नंददीप फाऊंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे आनन्यात आले…………………
काहीच न बोलनार माहरूफ यवतमाळ मध्ये येताच त्याच्यावर विशेश उपचार करन्यात आले मानसोपचार तज्ज्ञ डॉ श्रीकांत मेश्राम सरांनी त्याचेवर विशेश औषधोपचार केले दर महिन्याला औषधांमध्ये बदल करीत गेले माहरूफ त्या औषधाने हळूहळू बोलू लागला मानसोपचार तज्ज्ञ डॉ श्रीकांत मेश्राम सरांच्या औषधा सोबत पोलीस कवायतदार महेश कळसकर सरांची पिटी व्यायामाने जनू त्याचा पूनर्रजन्मच झाला टाॅक थेरपी संगीतोपचार असे अनेक उपचार झाल्याने तो नंददीप मध्ये सेवा देऊ लागला आणी काय चमत्कार त्याने आपला पत्ता सांगितला परंतू गावाचा उत्तर प्रदेश राज्यात निशांत भाऊ सायरे यांनी नेले तेथून त्याचा परीवार मूंब्ई ला गेल्याचे कळताच निशांतने मूंब्ई ला जाऊन आई वडील भावाचा शोध घेऊन माहरूफला त्यांच्या ताब्यात दिले 9 वर्षा पासून बेपत्ता असलेला माहरूफ घरी परतला घरच्यांनी नंददीप फाऊंडेशन चे आभार मानले जय गाडगे बाबा
!! मेल्यावर खांदा देन्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या