विदर्भवाद्यांचा ‘विदर्भ राज्य संकल्प दिन’ साजरा.
महामहिम राष्ट्रपतींसह पंतप्रधानांना पाठवले इमेल
उमरखेड
राज्य पुनर्रचना आयोग अर्थात न्या. फझल अली कमिशनने वेगळ्या विदर्भाची शिफारस १० ऑक्टोबर १९५५ रोजी केल्याचे औचित्य साधून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने आज 10 ऑक्टोबर शनिवारी ‘विदर्भ राज्य संकल्प दिन’ पाळण्यात आला आहे
फझल अली आयोगात के. एम. पन्नीकर व इंद्रनाथ कुंजरू यांचा समावेश होता. १० ऑक्टोबर १९५५ रोजी आयोगाने केंद्र सरकारला अहवाल सादर केला. विदर्भ हा सधन प्रदेश व वेगळी संस्कृती आहे. या प्रांताचा विकास होऊ शकतो. हा प्रांत केव्हाही महाराष्ट्रासोबत नव्हता, त्यामुळे विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे, असे आयोगाने एकमुखी नमूद केले.
विदर्भावरील अन्याआविरोधात विदर्भ राज्य संकल्प दिन साजरा करण्यात आला असून. १० ऑक्टोबर या तारखेला सर्व जिल्हा व तालुका पातळीवरून राष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांना ई-मेलद्वारे ‘वेगळ्या विदर्भ राज्याची तत्काळ घोषणा करा’ अशी मागणी करण्यात आली तसेच, सर्वत्र लहान मोठ्या बैठका वा निदर्शनातून आयोगाच्या शिफारशींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलिसल्याचे प्रतिपादन विदर्भ राज्य जन आंदोलन समितीचे कोअर कमिटी सदस्य सुरेंद्र कोडगिरवार यांनी केले
फझल अली आयोगाच्या वेगळ्या विदर्भाची शिफारशीची अंमलबजावणी तर दूर, वैदर्भीय जनतेची संमती न घेता महाराष्ट्रात विदर्भाचा समावेश करून जनतेची फसवणूक केली. नागपूर कराराचा भंग केला. यापुढे अन्याय सहन केला जाणार नाही. फझल अली कमिशनच्या शिफारशी, विदर्भाची फसवणूक, विकासासाठी वेगळे राज्य हा एकमेव पर्याय याबाबत जनजागरण करण्यात येईल, असे विदर्भ जनआंदोलन समिती कोअर कमिटी सदस्य तथा ज़िल्हा अध्यक्ष सुरेन्द्र कोडगिरवार यांनी सांगितले सदर आंदोलनात
प्रा वी ना कदम स्थानिक कोर कमिटी सदस्य तथा माजी आमदार
विजयराव खडसे शहर अध्यक्षआनंदराव चीकने युवा आघाडी अध्यक्ष दीपक ठाकरे तालुका प्रमुख भास्कर पंडागळे यांचे समवेत
राजूभैय्या जयस्वाल विधितज्ज्ञ संतोष जैन , सलमान अशहर , सचिन रुडे , प्रवीण सूर्यवंशी , ऐड. शिवाजी वानखेड़े अविनाश मुन्नारवार ऍड राजेश्वर रायेंवार , डॉक्टर अरुण बंग , डॉक्टर त्र्यंबक माने यांचेसह आनेक वैदर्भीय आंदोलकांनी सहभाग नोंदवला आहे