पळसा येथील वैष्णवी घिरटकर चे आय.आय.टि.मध्ये यश.
पळसा येथील वैष्णवी घिरटकर चे आय.आय.टी.मध्ये यश
हदगाव …… हदगाव तालुक्यातील पळसा येथील रमेश घिरटकर यांनी आपल्या हलाखीच्या परिस्थितीत शिक्षणाचा श्रीगणेशा पळसा येथे सुरू करुन पहिली ते दहावीपर्यंत पळसा येथे शिक्षण घेत अॕग्रीचे शिक्षण घेऊले. साखर कारखान्यांमध्ये स्लिप बाॕयचे काम करत जिद्द न सोडता स्पर्धा परीक्षेत यश मिळवून ग्रामसेवकाची नौकरी मिळवली.आपली नौकरी करीत त्यांच जिद्दीने आपल्या दोन्ही मुलीला शिकवले.पहीली मुलगी माधवी सध्या मुंबई येथे एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेत आहे.तर वैष्णवीने प्राथमिक शिक्षण गांधी विद्यालय परभणी येथे घेतले.माध्यमीक शिक्षण कमला नेहरू नांदेड येथे घेत अकरा वी बारावी सायन्स कॉलेज नांदेड येथे घेत वैष्णवी हीने JEE main च्या पात्रतेनुसार पहिल्या फेरीतच आय. आय. टी. नागपूर येथे कंप्युटर इंजिनीअरिंगमध्ये निवड होऊन प्रवेश मिळवला.
कदाचित हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील या वर्षीची वैष्णवी घिरटकर ही या वर्षातील प्रथम मुलगी असेल, जिणे IIT सारख्या अती अवघड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असल्याने कुटुंबाचे गावाचे नाव उज्वल केले असल्याने पळसा सह हदगाव तालुक्यात कौतुक केले जात आहे.