सुवर्णा कानवडे यांच्या वाढदिवसा दिवशी अनोखी. संकल्प राज्यतिल अन्याय अत्याचार पिडीत महिला मुलीची पुनर्वसन ची घेणार जबाबदारी.
सौ सुवर्णा ताई कानवडे यांचा वाढदिवसा दिवशी अनोखा संकल्प राज्यातील अन्याय अत्याचार पिडीती महिलां मुलीची पुनर्वसनाची घेणार जबाबदारी
ठाणे : ‘राज्यात करोनाचं संकट आहे. त्यामुळं कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नका. त्याऐवजी करोनामुक्तीसाठी प्रयत्न करा. याच माझ्यासाठी या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत,’ असं भावनिक आवाहन श्रमिक पत्रकार संघाचे, मानवी अन्याय निर्मूलन संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष, संघटिका सौ सुवर्णा ताई कानवडे व कल्याण कोकण टाइम्स च्या राज्य उपसंपादक यांनी संघटनेच्या कार्यकर्ते व हितचिंतकांना केलं आहे.
ताई यांचा 15 ऑक्टोबर दिवशी वाढदिवस होता त्या अगोदर ताई ने जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना विनंती केली होती . मागील ताईच्या कार्याचा अहवाल पाहता ताईची श्रमिक पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा संघटिका ह्या पदावर संस्थापक प्रकाश गणपत संकपाळ यांनी नियुक्ती केली होती ताई सतत आपल्या पदाचा वापर करून राज्यात महिला अन्याय अत्याचार वर मोठ्या प्रमाणात काम करत आहेत आज पर्यत ताईने शेकडो महिलांना कोटूंबिक हिंसाचार, बलात्कार अपहरण .जेष्ठ नागरिकांनवर हिंसाचार बाबत अनेक समस्यांना सोडविण्यात ताई ना यश मिळाले आहे. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक नामदार ओमप्रकाश बच्चू कडू यांना महिला व बाळ कल्याण त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली असल्याने ताईने राज्यातील अनेक महिला महिला संरक्षण अधिकारी यांच्या मदतीने न्याय मिळवून देण्याची मोठी भूमिका पार पाडत आहे ताई ने असा संकल्प केला आहे की आंध्र प्रदेश या राज्यात महिला अत्याचार बाबत आरोपीना २१ दिवसात शिक्षा होते हा कायदा ही महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे या साठी २५००० महिला ना घेऊन ताई विधान भवन गाठणार आहेत असा ही संकल्प ताईने घेतला आहे. त्यामुळं त्यांचं सामाजिक वजन प्रचंड वाढलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतरचा त्यांचा हा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करण्याची किंवा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन सौ सुवर्णा ताई यांनी फोन द्वारे आवाहन केलं आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका. ठाणे जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर करोनाच्या संकटाचे सावट आहे, यातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी आहेत तिथेच राहून प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला लढण्याचे बळ देतात, परंतु यावर्षी करोनाशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. आपण सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच, कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्यावी,’ असंही ताईने फोनवर आपल्या कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधले
सतत महिला अन्याय अत्याचार विरुद्ध काम करणारे ताई व सतत महिलांना घडविणाऱ्या सुवर्णा ताई प्रतिनिधी व पिडीती यांच्या गराड्यात वावरणाऱ्या सुवर्णा ताई यांच्या मागील दिवसात मोठ्या मुलाला वेळ न दिल्या मुळे टायफायड ची लागण झाली होती. कल्याण येथे उपचार घेतल्यानंतर व लोकांच्या पार्थने मुळे ते ठणठणीत झाले. मात्र, त्या काळात त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. अनेकांनी त्यांच्या मुलाच्या प्रकृतीसाठी नवससायास व उपासही केले होते. त्यावेळीही सुवर्णा ताई यांनी पदाधिकारी याना एक आवाहन केलं होतं.की जरी मी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने माझ्या मुलांना टायफायड हा आजाराला सामोरे जावे लागले होते.
पण जर माझा मुलगा आहे तसा समजा ही माझ्या साठी इतका महत्वाचा आहे . जेव्हा मी माझ्या मुलाला आजारी सोडू शकत नाही त्याला बर करण्यासाठी पाहिजे तेवढे प्रयत्न मी करत आहे तस प्रयत्न माझ्या बहिणी यांच्यावर एखाद्या मानसिक विकृतीचा माणसाचा आजरा झाला असेल तर मला तो आजार कायमचा कायदेशीर उपचार करून माझ्या बघिणी हिला सुख रूप बर करने हे माझें प्रथम कर्तव्य आहे आणि मी त्यासाठी सतत तत्पर प्रयत्न शील असेल असे ही सागितले.
ताई ने असे ही आवाहन केले आहे की ज्या महिला व मुली व बालके यांच्यावर एकदा प्रसंग होऊन अत्याचार होत असेल तर ह्याचा पुनर्वसन करणं शासनाच काम आहे . पण शासन पुनर्वसन करत नसेल तर राज्यातील अन्याला बळी पडलेल्या कोटूंबिक हिंसाचार बलात्कार ऍसिड हल्ले सारख्या गुन्ह्यात बळी पडलेल्या महिलाच पुनर्वसन आम्ही नक्की करू, पीडित महिले ने योग्य माहिती साठी किंवा मदतीसाठी मानवी अन्याय निर्मूलन संघटना शी नक्की संपर्क करावाअसे ही सगीतले या साठी सुवर्णा ताई ने एक नंबर संपर्क साठी दिला आहे 8928765351 ज्यामुळे पिढीतिला थेट संपर्क करता येईल
राज्यात ज्या महिलांवर अन्याय अत्याचार झाला असेल किंवा होत असेल .
त्यांनी मानवी अन्याय निर्मूलन संघटनेशी संपर्क करावा संघटना नक्की त्यांना योग्य मार्गदर्शन करून न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करेल असे ही माहिती दिली