प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ विदर्भ विभागाच्या वतीने कोविड योध्दाचा सन्मान.
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,विदर्भ विभागाच्या वतीने कोविड योद्धांचा सन्मान*
*विदर्भ महिलाध्यक्षा पत्रकार सविता चंद्रे यांच्या पुढाकाराने प्रेरणादायी उपक्रम.*
नांदेड : प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य विदर्भ विभागाच्या वतीने दि.२४/१२/२०२० रोजी हदगांव तालुक्यातील के.प्रा.शा.चिंचगव्हाण येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विदर्भ महिलाध्यक्षा पत्रकार सविता चंद्रे यांच्या पुढाकाराने संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगांवे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड योध्यांचा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोविड १९ आपत्तीमध्ये आरोग्य प्रशासन, पत्रकार, सामाजिक संस्था, दानशुर व्यक्तीसह विविध स्तरावर केलेल्या सामाजिक बांधिलकीचा सन्मान व्हावा यासाठी कोरोना नियमांचे पालन करित आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून प्रशाळेचे मुख्याध्यापक बेग आय.जी. यांच्या हस्ते इस्माईल पिंजारी (पत्रकार दै. देशोन्नती), हरिश्चंद चिल्लोरे (संस्थापक जीवनांकुर ब.से.सं.) प्रेमराव भुतनर (पोलिस पाटील ), लक्ष्मण लोमट (पोलिस पाटील), संतोष मस्के (सामाजिक कार्यकर्ता) अशोक जोगदंड (सरपंच), सुनिता बर्गे (सरपंच), संगीता गोरे (आरोग्य सेविका), विमल भुसावळ (अंगणवाडी कार्यकर्ती), सुरेखा तगडपल्लेवार (अंगणवाडी कार्यकर्ती), सिंधू गव्हाळे (अंगणवाडी कार्यकर्ती), रंजना सूर्यवंशी (आशा वर्कर), ज्योती दामोदर (अंगणवाडी सेविका) यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.