करंजी ग्रामपंचायत च्या संरपच पदी शुद्धोधन घुगरे तर उपसंरपच किरणताई काकडे बिनविरोध निवड.
करंजी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी शुद्धोधन घुगरे तर उपसरपंच किरणताई काकडे बिनविरोध निवड
करंजी…
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी एकता ग्राम विकास पॅनलचे युवा, तरुण तडफदार श्री शुद्धोधन घुगरे 21 व्या वर्षी निवड करण्यात आली. तर उपसरपंच पदी किरणताई मारोती काकडे यांची निवड करण्यात आली. या निवडीमध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य रेखाताई राहुल गायकवाड वय 30 वर्षे, अरुण संभा घुगरे वय 36 वर्षे, किरण धोंडबा सोमेवाड वय 21 वर्षे आणि अश्विनीताई मसाजी भालेराव यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले. या निवडणुकीत सर्व नवीन आणि युवा उमेदवारांनी विकास आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावर निवडणूक लढविली व जनता जनार्दन मतदार राजांनी भरभरून प्रतिसाद देत प्रचंड मतांनी सर्व उमेदवारांना निवडुन दिले. यामध्ये प्रामुख्याने निवडणूक अधिकारी जयस्वाल साहेब यांनी काम पाहिले. तसेच राहुल देवराव चंद्रे (पॅनल प्रमुख) या युवा शिक्षकाने सर्व तरुण युवकांना संघटीत करून गावाच्या विकासाची मूर्तमेढ रोवली. खऱ्या अर्थाने या निवडणुकीत लोकशाहीचा आणि प्रामाणिकपणाचा विजय झाला असे मत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी व्यक्त केले. व निवडणुकीतील विजय गावातील सर्व प्रिय मतदारांना समर्पित केला. याप्रसंगी समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले संजय घुगरे, बापूराव वाढवे, दत्ता घुगरे, संभा घुगरे, विश्वनाथ जांभुळकर, राहुल गायकवाड, वैभव मुकटे, शेख खाजा शेख भिकन, अंकुश जांभुळकर, गणेश काकडे, किरण लुट्टे, पवन मस्के, विजय वाढवे, सदानंद काकडे,सतीश घुगरे, चंद्रामनी कदम, अजय मस्के या युवकांनी खूप परिश्रम घेतले.तसेच पोलीस कर्मचारी संतोष मुडे याचा कडक बंदोबस्त होता.
Very interesting details you have mentioned, thanks for putting up.Leadership