मनोरूगन आणि बेघर यांच्या पर्यत कोरोना लस कधी जाणार.
मनोरुग्ण आणि बेघर,यांच्या पर्यंत-‘कोरोना’लस कधी जाणार
उमरखेड:(तालूका प्रतिनिधी)..सविता चंद्रे…
संपुर्ण महाराष्ट्रात, ‘कोरोना’ ची दहशत चालू आहे. कोरोना पासून कशी काळजी आणि दक्षताघ्यावी ,ह्या साठी महाराष्ट्र सरकार तर्फे, सर्वोतपरीने प्रयन्त आणि उपाययोजना,पण राबविल्या जात आहे.
पण उमरखेड, शहरामधील असे काही, मनोरुग्ण आणि बेघर आहेत. यांच्या पर्यंत आणखीन, आरोग्य यंत्रणा पोहचलेली दिसत नाही.
मनोरुग्ण आणि बेघर, ह्यांची काळजी घ्यायला,एक तर त्यांचा परिवार नाही,मग यांच्या कडे लक्ष देणार तरी कोण.
हे सुद्धा,आपल्या सारखा सर्वसामान्य माणुसच,एक तर यांच्या कडे मास्क आणि सॅनिटायजर आणखीन पोहचलेले नाहीत.सोबत यांना जेवण, पाणी,वेळेवर मिळत नाही.असे काहीतरी फेकलेले फळे, हॉटेल मधील शीळ अन्न खाऊन, जगत असतात.
आणि रात्रीला त्यांना, अंथरून व पांघरून पण नसते.
तर यांच्या कडे,लक्ष देण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांनी पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे.