माझ गाव माझी जबाबदारी पिरंजी ग्रामपंचायत स्वतः घेत आहे.
माझं गाव माझी जबाबदारी
पिरंजी ग्रामपंचायत स्वतः घेत आहे गावकऱ्यांची जबाबदारी
उमरखेड..पिरंजी
आज गावागावात,आणि प्रत्येक वॉर्ड मध्ये ‘कोरोनाचा’ संसर्ग वाढत असता,पिरंजी येथील ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाऊल उचलले.
गावाचे सरपंच-श्याम होलगीर , उपसरपंच शंकरराव सुळ, सदस्य संतोष भवाळ ,देवानंद पाईकराव, कृष्णा लोखंडे (प्रतिनिधी )यांनी पिरंजी आरोग्य उपकेंद्राला भेट दिली, असता आणि गावात कोरोना टेस्ट साठी कॅम्प लावन्याची मागणी केली.
त्यांच्या विनंतीला मान देऊन समुदायीक अधिकारी डॉ. गजानन अक्कावार आणि आरोग्य सेवक डॉ.जाधव यांनी लगेचच गावात कॅम्प घेतला.
त्यातून पॉजिटीव्ह निघालेल्या पेशंट ची काळजी घेण्याची जबाबदारी स्वतः गावच्या प्रतिनिधिनी घेतली.
गावात मास्क वाटप केले, घरोघरी जाऊन पल्सरेट आणि टेम्परेचर तपासले पॉजिटीव्ह निघालेल्यांना होम क्वारंटाईन करून त्यांना आवश्यक ते गरजा पुरवल्या.
पेशंट चांगले पण झालेत तसेच गावात लोकांना लस घेण्याबाबत जन जागृती करतांना सरपंच प्रतिनिधी श्याम होलगीर, उपसरपंच शंकरराव सुळ, सदस्य संतोष भवाळ, देवानंद पाईकराव, कृष्णा लोखंडे आदींचा सहभाग होता.
*फोटो,जनजागृती करत असतांनी*