पूस नदीपात्रात एका अज्ञात महिलेची आत्महत्या.
पुस नदीपात्रात एका अज्ञात महीलेची आत्महत्या केलेल्या महिलेचे प्रेत सापडले.
शोध कार्य परवा मध्यरात्री पर्यंत सुरूच होते
पुसद…
दिनांक 22 जुलै सायंकाळी साडेचार ते पाच वाजता चे दरम्यान पुसद दिग्रस रोडवरील पुस नदीच्या पुलावरून अचानक पणे पुला वरून उडी मारली आजूबाजूचे पाहणाऱ्यांनी एकच गलबला केला व या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली त्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलीस निरीक्षक ठाकूर , दिनेशचंद्र शुक्ला पोलीस निरीक्षक पुुुसद शहर , पोलीस निरीक्षक वसंत नगर पुसद , व इतर पोलिस अधिकारी यांच्या मदतीने शोध कार्यास सुरुवात करण्यात आली. परवा रात्रीपर्यंत शोधकार्य मोहीम चालू होती परंतु यश आले नाही त्यामुळे दिनांक 23 जुलै रोजी, सकाळी आठ वाजता दरम्यान आपत्ती व्यवस्थापन यवतमाळ च्या टीम ने शोध कार्य सुरू करताच तीन तासाच्या अथक प्रयत्नातून मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आले. सदर मुलगी हनुमान वार्ड पुसद येथील जानवी संजय मगर वय १७ वर्ष हे असल्याची ओळख पटल्याने नातेवाईकांना कळविण्यात आले .
पूस नदीच्या पात्रात एका महिलेने उडी घेतल्याने चिंताग्रस्त झालेल्या पुसद करानि, मुलीचे प्रेत सापडल्याने एक प्रकारे निश्वास सोडला.