गणेशवाडी येथील विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह.

गणेशवाडी येथील विहीरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह.
उमरखेड …..
उमरखेड तालुक्यातील बिटरगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गणेशवाडी येथील बिटरगांव ते सहस्रकुंड मार्गावर विजय रुडे यांच्या शेतातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत अज्ञात इसमाचे प्रेत विहीरीत तरंगताना दिसले.
ही घटना दि 29 ऑगष्ट रोजी रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली असून मृतदेहाची परिस्थिती पाहता हा मृतदेह तीन दिवसांपासून ह्या विहीरीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती बिटरगाव पोलीस स्टेशनला मिळताच घटनास्थळी ठाणेदार प्रताप बोस,बिटजमादार अतिश जारंडे , रवि गिते,मोहन चाटे, नरेंद्र खामकर तपास करत असुन मृतदेहाची ओळख सध्यातरी पटलेली नाही.पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन करीत आहे.