सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव गोपेवाड यांचा सेवानिवृत्त समारंभ सोहळा शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते संपन्न.

youtube

सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव गोपेवाड यांचा सेवानिवृत्ती समारंभ सोहळा शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

ढाणकी….

येथील स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय ही शाळा ढाणकी मध्ये 1984 पासून सुरु झाली व 1990 मध्ये नामदेव गोपेवाड सर यांनी पदभार स्वीकारला होता.आज 31 वर्षे आयुष्याचे संपूर्ण नोकरी करून सेवा संपली .तसेच विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारे व प्रत्येक क्षेत्रात मध्ये आपले योग्य मोलाचे मार्गदर्शन करून यशाच्या शिखरावर विद्यार्थ्यांना पोहोचवनारे आज नामदेव गोपेवाड यांची सेवानिवृत्तीचा कार्यक्रम व त्यांचा निरोप समारंभ स्वामी पेंडसे विद्यालयात ठेवण्यात आला. तसेच त्यांना निरोप देताना आमदार किरण सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. आ. किरण सरनाईक यांनी भाषण मधे नामदेव गोपेवाड यांना मी तीन-चार वर्षांपासून ओळखतो त्यांच्या कामाचा आढावा अतिशय छान होता. तसेच शाळाला वृंदावन सारखे ओळख त्यांनी निर्माण करून दिली. असे त्यांनी म्हटले. तसेच नामदेव गोपेवाड सरांचा सन्मान करताना मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी प्रमोद देशमुख. अध्यक्ष मुनेशवर , उपाध्यक्ष भगत मॅडम, तालुका उपाध्यक्ष युवक मंडळ पुसद चे सचिव विजय जाधव तसेच माजी विद्यार्थी व शाळेची कर्मचारी यांनी कार्यक्रम घडवून आणला व त्यानी पन सत्कार केले. तसेच या कार्यक्रमाला सर्व चिमुकले विद्यार्थी, माजी विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक आमदार किरण सरनाईक, बधु अरविंद सरनाईक, रंगराव काळे .नगराध्यक्ष जयस्वाल डाँ रावते. वसंतराव चंद्रे,ठाणेदार भोस ,माजी सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तसेच गावकरी मंडळी, पत्रकार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Google Ad
Google Ad

1 thought on “सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव गोपेवाड यांचा सेवानिवृत्त समारंभ सोहळा शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांच्या हस्ते संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!