ढाणकी येथे अखेरच्या दिवशी तब्बल 14 उमेदवारांचे नामांकन दाखल.
ढाणकी येथे अखेरच्या दिवशी तब्बल १४ उमेदवारांचे नामांकन दाखल.
[अपक्षांच्या एन्ट्रीने रंगणार पोटनिवडणूक.- ढाणकी नगर पंचायत पोटनिवडणूक २०२१]
ढाणकी –
ढाणकी नगर पंचायत पोटनिवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर दि. १ डिसेंबर ते ७ डिसेंबर नामांकन दाखल करण्याचा कालावधी होता, परंतु सुरुवातीचे सहा दिवस नगरपंचायत मध्ये एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने, ढाणकी शहरात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. परंतु शेवटच्या दिवशी दि. ७ डिसेंबर रोजी नगरपंचायत परिसर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी गजबजू लागला. अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवारांसह राजकीय पक्षाच्या एकूण १४ उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले.
प्रभाग १२ व १३ हे अनुसूचित जमाती करिता राखीव असल्याकारणाने, राजकीय पक्षांची तारांबळ उडाली. यात प्रभाग १२ हा अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव असल्यामुळे, यामध्ये नाटकर योगिता श्रीकांत व मंतेवाड दुर्गा साईनाथ भाजप, पराते कमल रमेश, पराते वंदना दत्ता, नीलपवार लीला निलेश शिवसेना, आणि पराते कमल रमेश, ब्रम्हटेके जनाबाई रामदास अपक्ष असे एकूण ७ नामांकन दाखल झाले.
तर प्रभाग १३ अनुसूचित जमाती पुरुष राखीव, यामध्ये कुसरे अनिल दत्तात्रय व केशेवाड मोहिनी पंकज भाजप, पराते स्वप्निल रमेश, पराते वंदना दत्ता, नंदनवार प्रफुल दिलीप शिवसेना, आणि मेंडके गजानन संभाजी, पराते स्वप्निल रमेश अपक्ष असे एकूण ७ नामांकन दाखल झाले.
यावरून भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष अशी तिरंगी लढत होणार का? तर भाजपाने आपल्या उमेदवारांचे नामांकन भरण्याकरिता केलेले शक्तिप्रदर्शन निवडणूक होईपर्यंत आबाधित राहिल काय? प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यावर कोण बाजी मारणार? ही येणारी वेळच सांगेल. अशी चर्चा शहरात रंगली.




I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
I am currently writing a paper and a bug appeared in the paper. I found what I wanted from your article. Thank you very much. Your article gave me a lot of inspiration. But hope you can explain your point in more detail because I have some questions, thank you. 20bet