शिळोना घाटात पुसद आगाराक मधील बस उमरखेड कडे येत असताना भर रस्त्यात अचानक पेटली भर उन्हात.
*शिळोना घाटात पुसद अगारक मधील बस उमरखेड कडे येत असताना भर रस्त्यावर अचानक पेटली भर उन्हात*
उमरखेड…
पुसद आगाराची बस हे पुसद वरून उमरखेड कडे जात असताना शिळोना घाटात बस ने अचानक पेट घेतल्यची घटना दिनांक २७ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली..
पुसद आगाराची बस क्रमांक एम एच ४०, ६१७० ही पुसद वरून उमरखेड कडे जात असताना शिळोना घाटात बसच्या समोरच्या भागात अचानक आग लागल्याची घटना घडली. आग शार्ट सर्किट मुळे लागल्यची शक्यता वर्तवली जात आहे. बस मध्ये एकुण तीस ते पसतीस प्रवासी प्रवास करीत होते, बसच्या समोरच्या भागाला आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजुला उभी केली व लवकरच सर्व प्रवाशांना बाहेर निघण्याची सुचना दिल्या ने मोठी जीवीत हाणी टळली, मात्र या मध्ये बस चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती पुसद नगरपरिषद ला देण्यात आली. पुसद नगरपरिषदे च्या अग्निशमन दलाने बस वरच्या आगीवर नियंत्रण मिळवले.. या घटनेमुळे रस्त्याचे दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती..