छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पोवाड्याचा कार्यक्रम 16 मे रोजी स्थानिक माहेश्वरी नाट्यगृह येथे

youtube

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पोवाड्याचा कार्यक्रम 16 मे रोजी स्थानिक माहेश्वरी नाट्यगृह.

उमरखेड : –

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे मराठा युवा मंच प्रणित संभाजी राजे यांच्या जयंती औचित्य साधून झी युवा संगीत सम्राट फेम सुप्रसिद्ध शिवशाहीर शिवश्री रामानंद उगले यांचा विद्युत रोशनाई सहित बहारदार पोवाड्याचा कार्यक्रम दिनांक 16 मे रोजी सायंकाळी सहा वाजता स्थानिक माहेश्वरी नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमास सर्व संभाजी प्रेमींनी जास्तीत जास्त व उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती च्या वतीने करण्यात आले आहे.
उमरखेड शहरात मराठा युवा मंच च्या वतीने प्रथमता मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी होत असून आज दिनांक 14 मे रोजी सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली यामध्ये 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. 16 मे रोजी होणाऱ्या पोवाड्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सभापती रामभाऊ देवसरकर प्रमुख उपस्थिती आमदार नामदेवराव ससाने स्वागताध्यक्ष मोहनराव मोरे हे राहणार असून अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या अभूतपूर्व आणि अविस्मरणीय सोहळ्यास सर्व शंभूप्रेमी उपस्थित राहण्याचे आवाहन जन्म उत्सव समितीचे अध्यक्ष गोपाल कलाने , सचिव रविराज धबडगे तथा मराठा युवा मंचचे सुनील देवसरकर यासह सर्व समितीच्या सदस्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!