पुराच्या पाण्याने अडकलेल्या वारकऱ्यांना केले अन्न दान वाटप.
पुराच्या पाण्याने अडकलेल्या वारकऱ्यांना केले अन्न दान वाटप
ढाणकी प्रतिनिधी
पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनास ढाणकी परिसरातील गावचे वारकरी गेले होते माउलीचे दर्शन घेऊन गावी परत जात आसतांना गावसीमेजवळील ढाणकी येथील जन्गल भागातील गावांना जाणाऱ्या रस्त्यावरील आठरी च्या नाल्यावर पुराचे पाणी वाहत असल्याने रहदारी दोन दिवसा पासून ठ प झाली होती त्यामुळे ग्रामीण भागात जाणारे नागरिक ढाणकी शहरात अडकून पाडले होते रात्र भर विना अन्न पाण्याचे पुराचे पाणी उतरण्याची वाट पाहत होते मात्र पुलावरील पाणी उतरण्याचे नाव घेत नव्हते सकाळ उजडताच विनोद गायकवाड यांच्या निदर्शनास आले कि पुराच्या पाण्यापुळे बाहेर गावातील वारकऱ्या सह इतर नागरिक बस स्टॅन्ड वर अडकून आहेत त्यांनी लागलीच सामाजिक कार्यकर्ते गजानन मिटकरे दुर्गवार पटवारी तहसीलदार आनंद देऊळगावकर ठाणेदार प्रताप भोस याना कळविले सकाळचा चहा बिस्कीट गजानन मिटकरे यांनी दिला गुडमेवर हॉटेल कडून खिचडी आणी फराळ देण्यात आला तहसील दार आनंद देऊळगावकर यांच्या सुचणे वरून पोलीस पाटील रमण रावते यांनी सर्व चे गुलाबसिंग हॉस्टेल मध्ये थांबण्याची भोजनाची व्यवस्था केली
यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील नगरसेवक बाळाभाऊ योगेवार नगरसेवक चंपत मिटकरे वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव प्रशांत विनकरे यांनी भेट देऊन सर्व प्रवास्यांची वारकऱ्याची विचार पूस केली
सर्व वारकरी प्रवासी यांनी उपस्थियांचे आभार मानले
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://www.binance.info/ur/join?ref=GJY4VW8W