टेभुदरा येथील इसमाची आत्महत्या.

youtube

टेभुदरा येथील इसमाची आत्महत्या.

*ढाणकी

येथुन जवळचं असलेल्या टेंभुरदरा येथील इंदल सक्रु जाधव वय ५५ वर्ष या इसमाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आत्महत्या करणाऱ्याच्या मुलाच्या राजु इंदल जाधव यांच्या फिर्यादीहून गजानन रामराव राठोड, रामराव जेता राठोड,विनोद रामराव राठोड, शोभाबाई रामराव राठोड यांचे विरुद्ध भादंवी कलम ३०६/३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
इंदल जाधव यांनी स्वतः चे कर्ज चुकविण्याकरीता स्वतः ची शेती गजानन राठोड यांना ६ वर्षापूर्वी ६ लाख रुपयाला विकली. व आजपर्यंत ते ६ लाख रु.देण्यास राठोड टाळाटाळ करत असल्यानेच वडिलांनी आत्महत्या केल्याचा मृताच्या मुलाचा राजु इंदल जाधव चा आरोप आहे.
पुढील तपास बिटरगांव पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!